नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेक लग्नसमारंभ रखडले होते, तर काहींनी साध्या पद्धतीने आपली लग्न उरकली होती. दोन देशात असलेल्या जोडप्यांची तर पंचाईतच झाली होती. मात्र तसे असले तरी लग्न झालीच. अशाच एका साध्या पद्धतीने पार पडलेल्या विदेशी भारतीय सुनेच्या लग्नाची प्रेमकहाणी जाणून घ्या.
मूळचा कोलकाताचा असलेल्या मेघदूत अभ्यासासाठी फ्रान्सच्या पॅरिसमध्ये गेला होता. 2014 ला एचईसी महाविद्यालयात अभ्यास करता करता त्याचे कॉलेजमधल्याचं पॉलीनशी प्रेमसंबंध जडले. मेघदूतने तिला कॉलेजमध्ये प्रपोज केले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2019 रोजी दोघांनी रजिस्टर मॅरीज केले. मात्र काही वर्षानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यामुळे त्या दोघांना रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित करता आला नव्हता. आता मात्र या जोडप्यासाठी पॅरिसमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
'आज तक' शी बोलताना मेघदूत म्हणाला की, पॅरीसमध्ये त्यांच्या विवाह सोहळयानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. कॉलेज स्वतः 'ऑफिशियल मॅरेज सेलिब्रेशन' आयोजित करत असल्याचे त्याने सांगितले. या कार्यक्रमात जोडप्याचा भव्य विवाह सोहळा 23 जुलै रोजी पॅरिसमधील कॉलेजमध्ये पार पडणार आहे. जिथे हे जोडपे प्रथम भेटले होते.
मेघदूत पुढे म्हणाला की, 2018 साली पॉलिन त्याच्यासोबत भारतात आली होती. यावेळी मेघदूतने पॉलीनची कुटुंबाशी ओळख करून दिली. एका वर्षानंतर मेघदूतने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. आणि तिने त्याला होकार दिला.आता या दोघांसाठी पॅरिसमधील कॉलेजमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मेघदूत हा एक उद्योजक आहे.तसेच पॉलिन शिक्षण क्षेत्रातही काम करते, याशिवाय ती सल्लागाराचे कामही करते.या जोडप्याची अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.