फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट, 4 ठार 2 जखमी

फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला.

सुरेंद्र गांगण | Updated: Sep 29, 2018, 10:49 PM IST
फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट, 4 ठार 2 जखमी  title=

भोपाळ : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यामुळे घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. ग्वाल्हेरमधील दर्पण वसाहतीत ही घटना घडली. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांना हादरा बसला. शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

मौत का सामान साबित हुआ फ्रिज, अचानक ब्लास्ट से घर के 4 लोगों की मौत

ज्या घरात हा स्फोट झाला त्यावेळी घरातील लोक झोपेत होते. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता आले नाही. दोन मजली घरात हा स्फोट झाला. पहिल्या मजल्यावर फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.कॉम्प्रेसर स्फोटाची कारणे तपासली जात आहे. दरम्यान, जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिती स्थिर आहे.