सिंहाच्या टोळीनं गाडीला घेरलं, जंगलाच्या राजाचा गाडीवर कब्जा, पाहा व्हिडीओ

माझ्या जंगलात विना परवानगी आलात कसे? म्हणत सिंहाकडून गाडीवर हल्ला, पाहा व्हिडीओ

Updated: Oct 21, 2021, 07:16 PM IST
सिंहाच्या टोळीनं गाडीला घेरलं, जंगलाच्या राजाचा गाडीवर कब्जा, पाहा व्हिडीओ

मुंबई: बऱ्याचदा सोशल मीडियावर सिंहाने प्राण्यांची शिकार केल्याचे किंवा पर्टकांवर हल्ले केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. आता मात्र या व्हिडीओची चर्चा यासाठी होत आहे की सिंहाने चक्क गाडीवर कब्जा आपल्या परिसरात आल्याच्या रागातून सिंहाच्या टोळीनं कारला घेरलं. इतकच नाही तर जंगलाच्या राजानं गाडीवर चढून त्यावर कब्जाही मिळवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की 3 सिंहांनी एका कारला घेरलं आहे. व्हिडीओमध्ये पुढे अचानक सिंहाचा कळप बाहेर आला आणि कारला घेरलं. एका सिंहाने बोनेटवर उडी मारली. 

दुसरा सिंह येऊन बाजूला उभा राहिला. त्याच वेळी, काही क्षणानंतर तिसरा सिंह येतो आणि त्याला दुसऱ्या बाजूने घेरतो. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की गाडीच्या आत बसलेले लोक हा सगळा प्रकार पाहून किती घाबरले असतील.

इंडियन फॉरेस्ट सर्विस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मजेशीर कमेंट्स युझर्सनी सोशल मीडियावर केल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत दी़ड हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.