मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जेथे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सक्रिय असते. मग तो व्यक्ती लहान असो किंवा वृद्ध एकदा का व्यक्तीला सोशल मीडीयाचा वापर कळू लागला की, तो येथे येण्याचा मोह रोखू शकत नाही. येथे प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे कंटेन्ट मिळतो. त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. असे व्हिडीओ आपण आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करतो. सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे, ज्यामुळे जर आपण सोशल मीडिया ओपन केला तर आपल्याला बरेच लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खूप मजेदार असतात.
सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लग्नातील एका डान्सचा आहे. या व्हिडीओमध्ये दोन जोडपी डान्स करत आहेत. परंतु डान्स करताना एक जोडप्यासोबत अशी घटना घडते की, ती पाहून तुम्हाला हसु आवरणार नाही.
या व्हिडीओमध्ये डान्स फ्लोअरवरती नवरा-बायकोमध्ये जे काही घडलं हे प्रत्येक माणसासाठी एक धडा आहे. कारण बऱ्याचदा लोकं ओघाओघात असं काही करुन बसताता, ज्यामुळे त्यांच्यावरती पश्चातापाची वेळ येते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन जोडपं लग्नात डान्स करत आहेत. 'तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा' हे गाणं वाजत आहे. नाचता नाचता अचानक नवरा आपल्या बायकोला डान्स फ्लोअरवर उचलण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि त्याचा तोल बिघडल्यामुळे दोघेही नवरा-बायको खाली पडतात.
Pyaar utna karo jitna sambhal sako
pic.twitter.com/HX9cQod9Zy— NB (@nitbatta) December 6, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीने म्हटले की, 'शक्तीसोबत युक्ती देखील वापरायची मग हे घडलंच नसतं.' तर दुसऱ्याने, 'बायकोच्या आणि तुझ्या वजनाचा तरी विचार करावा असे म्हटले आहे.'