''ही XXXतेगिरी बंद करा...नाहीतर तुमचं सरकार कधीच येणार नाही'', खुर्चीच्या फोटोवर राऊत संतापले

या फोटोवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तर दुसऱ्या बाजूने पाठराखणही झाली. या फोटोला सोशल मीडियावर कुणी काय कॅप्शन दिलं यापेक्षा

Updated: Dec 9, 2021, 03:29 PM IST
''ही XXXतेगिरी बंद करा...नाहीतर तुमचं सरकार कधीच येणार नाही'', खुर्चीच्या फोटोवर राऊत संतापले

नवी दिल्ली : संजय राऊत यांचा हा फोटो काही दैनिकांनी सोशल मीडियाच्या फेसबूकपेजवर पोस्ट करुन, कॅप्शन द्या म्हणून आवाहन केलं होतं. या फोटोवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तर दुसऱ्या बाजूने पाठराखणही झाली. या फोटोला सोशल मीडियावर कुणी काय कॅप्शन दिलं यापेक्षा, या फोटोवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जी प्रतिक्रिया दिली, तिच मुळात वादात आली आहे.

संजय राऊत यांनी या फोटोवर कॅप्शन मागणाऱ्या आणि टीका करणाऱ्यांना अतिशय कडक शब्दात आणि वाईट शब्दात उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर भर पत्रकार परिषदेत केला आहे. या शब्दाला त्यांनी वेडेपणा असंही म्हटलं आहे.

आता संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ज्या शब्दात उत्तर दिलं आहे, त्यावर भाजप नेत्यांनी मुंबईत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं.

आणि ही xतेगिरी बंद करा - संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हा संस्कार दिला आहे. बाळासाहेब हेच गुरु आणि यशवंतराव चव्हाण हेच आमचे आदर्श आहेत. मोठ्यांचा आदर करणे ही संस्कृती आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, आणि ही xतेगिरी बंद करा. पुन्हा सांगतो ही xतेगिरी बंद करा. 

अशाने तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही - संजय राऊत

अशाने तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. विकृती तुमच्या डोक्यात, कचरा आहे तुमच्या डोक्यात आहे. हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्य डंम्पिग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाडून टाकतील.

अशा लोकांना खुर्ची देण्याचा तुम्हाला त्रास होत असेल. तर तुम्हाला फुले, आंबेडकर, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मोठ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना त्रास होतोय, शारिरीक वेदना होत आहेत, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे.