G-20 Summit: भारत G 20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. यासाठी भारत सरकार जोरदार तयारी करत आहे. G20 परिषदेच्या भव्य कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांपासून दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. G20 मुळे दिल्लीत अनेक सेवा, रेल्वे, मेट्रो, बस, कार्यालये, बाजार बंद राहणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत करोडो रुपये खर्च केले आहेत. पण त्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जी-20 नक्की काय आहे? हे कसे कार्य करते? याचा फायदा भारताला आणि सर्वसामान्यांना कसा फायदा होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
दिल्लीत होणाऱ्या G20 च्या बैठकीत भारत, चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना हे देश सहभागी होणार आहेत. दिल्ली येथे होणार आहे. राज्याचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जगातील 20 देशांना एकत्र करून हा एक शक्तिशाली गट तयार करण्यात आला आहे.
1999 पूर्वी काही वर्षे आशिया आर्थिक संकटाचा सामना करत होता, त्या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये G8 देशांची बैठक झाली आणि येथे G20 ची स्थापना करण्यात आली होती.
ग्रॅंडमास्टरला पंतप्रधान मोदींनी काय सल्ला दिला? प्रज्ञानंदने सांगितल्या भेटीतल्या गोष्टी
कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवल्याने भारताला किती फायदा होईल? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.G-20 च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारताला जगभरातील देशांसमोर 'ब्रँड इंडिया'ची प्रतिमा मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. त्याची सुरुवात इंडोनेशियामध्ये झालेल्या G-20 शिखर परिषदेपासून पंतप्रधान मोदींनी केली होती. त्यांनी देशाच्या विविध भागातून तयार केलेली उत्पादने जागतिक नेत्यांना भेट दिली होती. याचा भविष्यात देशात परकीय गुंतवणूकीसाठी फायदा होणार आहे.
ऊर्जा संकट आणि दहशतवाद थांबवणे हा यातील मोठा अजेंडा असेल, असे भारताने स्पष्टपणे सूचित केले आहे. त्यांना सामोरे जाण्याचा रोडमॅपही भारत जगातील देशांसमोर मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील 50 शहरांमध्ये G-20 शी संबंधित कार्यक्रमांच्या तयारीसाठी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यातून देशातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये भारतीय पर्यटनस्थळांची लोकप्रियता वाढेल. पर्यटनाला चालना मिळाल्यास पर्यायाने स्थानिकांनाही रोजगार मिळू शकणार आहे.
GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी
या कार्यक्रमाच्या माध्यमातून 'मेक इन इंडिया' प्रकल्पाला चालना मिळू शकते. जगभरातील देशांमध्ये भारतात बनवलेल्या उत्पादनांची पोहोच वाढणार आहे. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
शिखर परिषदेच्या माध्यमातून जी-20 देशांमध्ये भारताची प्रतिमा आणखी सुधारेल. दहशतवादाच्या मुद्द्यावर जगातील देशांनी एकजूट दाखवल्यास भारत चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना कठोर संदेश यामाध्यमातून जाईल. दरम्यान भारताकडे यजमानपद भूषवण्याची आणि जगासमोर स्वत:ला ठामपणे मांडण्याची संधी आहे.