३० वर्षांच्या महिलेवर केला सामुहीक बलात्कार...

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्हात ३० वर्षाच्या एका महिलेवर सामुहीक बलात्कार करण्यात आला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 30, 2017, 06:07 PM IST
३० वर्षांच्या महिलेवर केला सामुहीक बलात्कार... title=

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्हात ३० वर्षाच्या एका महिलेवर सामुहीक बलात्कार करण्यात आला.

घरी सोडत असल्याचे सांगितले...

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरनपुर बस स्थानकावर ही पीडित महिला बसची वाट बघत होती. त्याचदरम्यान दोघजण मोटारसायकलवरून आले आणि तिला घरी सोडत असल्याचे सांगितले. महिला गाडीवर बसल्यावर आरोपीने गाडी ऊसाच्या शेताकडे वळवली.

बलात्कार करून धमकी

सर्किल अधिकारी एस के एस प्रताप यांनी सांगितले की, शेतात नेऊन महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर झालेला प्रकार कोणासही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर महिला कशीबशी पोलीस स्टेशनली पोहचली आणि तिने तक्रार दाखल केली. 

तपास सुरू

आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.