GK Quiz In Marathi : कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न हमखास विचारले जातात. या प्रश्नांच्या उत्तरावरुन उमेदवाराची क्षमता तपासली जाते. याच उद्देशाने आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्ममंजुषा घेऊन आलो आहोत. या प्रश्नांवरुन तुम्ही तुमचं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे हे तपासू शकता. यातल्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला आधीपासूनच येत असतील तर या निमित्ताने पुन्हा एकदा उजळणी होईल. शिवाय जे उमेदवार स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांचासाठी या प्रश्नांची उत्तर देऊन तयारी करण्याची चांगली संधी आहे. विचारली गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तर तुम्ही आपल्या वहित नोंदही करुन ठेऊ शकता.
प्रश्न - कोणत्या भारतीय बँकेच्या सर्वाधिक शाखा आहेत?
उत्तर - स्टेट बँक ऑफ इंडिया
प्रश्न - गुगलची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर - गुगलची स्थापना 4 सप्टेंबर 1998 मध्ये मेनलो पार्क, कॅलिफोर्निया इथं झाली. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे गुगलचे संस्थापक आहेत.
प्रश्न - पृथ्वी कोणत्या दिशेने कोणत्या दिशेला फिरते?
उत्तर - पृथ्वी पश्चिमेकडे पूर्वेकडे फिरते
प्रश्न - हैदराबाद कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे?
उत्तर - तेलंगनाची राजधानी हैदराबाद दख्खनचं पठारवर मूसी नदीच्या किनारी वसलं आहे.
प्रश्न - हिंदी भाषेतलं सर्वात पहिलं वृत्त पत्र कोणतं होतं?
उत्तर - उदंत मार्तण्ड
प्रश्न - तुम्हाला माहित आहे का जेलीफीश काय असतं?
उत्तर - रस्त आणि ह्दय नसलेला हा एक छोटाशी जीव आहे. जेलीफिश एखाद्या माशासारखी असते.
प्रश्न - जागतिक कासव दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक कासव दिवस 23 मे या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न - भारतातल्या कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे?
उत्तर - भारतातील मिझोरम राज्य इस्त्रायल देशा इतकं आहे. मिझोरमचं क्षेत्रफळ 21,081 वर्ग किलोमीटर आहे. तर इस्त्रायल देशाचं क्षेत्रफळ 21,937 वर्ग किलोमीटर इतकं आहे.