महिलेनं चप्पल काढून तरुणाला असं चोपलं की पोलिसही पाहात राहिले...व्हिडीओ

भररस्त्यात पोलिसांसमोरच तुफान राडा, महिलेकडून तरुणाची चपलेनं धुलाई, व्हिडीओ व्हायरल

Updated: Aug 22, 2021, 07:43 PM IST
महिलेनं चप्पल काढून तरुणाला असं चोपलं की पोलिसही पाहात राहिले...व्हिडीओ title=

नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कधी हसवणारे कधी रडवणारे तर कधी मजेशीर व्हिडीओ असतात. एका महिलेनं तरुणीची केलेली धुलाई सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांसमोर तरुणाची कॉलर धरून महिलेनं त्याला बदडलं आहे. या तरुणाच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये टेम्पो ड्रायव्हरदिसत आहे. त्याला टेम्पोतून उतरवून ट्रॅफीक पोलिसांकडे दोन तरुण तक्रार करताना दिसत आहेत. टेम्पोच्या भाड्यावरून हा वादा झाला. तेव्हाच तिथे एक महिला येऊन त्याची कॉलर धरते आणि त्याला मारहाण करते. बाजूला उभे असलेले पोलीसही तिच्याकडे पाहतात. तिला रोखण्याचा एकदा प्रयत्न केला जातो. 

संतापलेली महिला कोणाचंही न ऐकता तरुणाची कॉलर धरून थेट चप्पल काढून तरुणाला मारहाण करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ लखनऊ इथला असल्याची माहिती मिळाली आहे. 

या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली नाही. ही महिला कोण आणि तिने या युवकाला चपलेनं का मारलं याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पोलीस असतानाही महिलेनं असं कृत्य करणं किती योग्य आहे असाही प्रश्न समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.