व्याजही मिळवा आणि करोडपतीही व्हा? वाचा नक्की काय आहे 'ही' योजना

करोडपती होण्याची स्वप्न सगळेच पाहात असतात पण तसं होणंही तितकेसे सोप्पे नाही.

Updated: Aug 20, 2022, 11:11 PM IST
व्याजही मिळवा आणि करोडपतीही  व्हा? वाचा नक्की काय आहे 'ही' योजना title=

Power of Compounding : पैसा कमवणे सोपे आहे पण ते वाढवणे तितकेच कठीण आहे. आपले पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावाही देतील असे साधन मिळणे दुर्मिळच. परंतु योग्य नियोजन करत आपल्या गुंतवणूकीचा फायदा करून घेणे हे महत्त्वाचे आहे. प्रथम तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढ्याच लवकर तुम्हाला भविष्यात चांगला होईल. 

करोडपती होण्याची स्वप्न सगळेच पाहात असतात पण तसं होणंही तितकेसे सोप्पे नाही. यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे लागते. यामागे Power of Compounding चे तत्त्व तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. 

काय आहे Power of Compounding?

मूळ गुंतवणुकीवर व्याज

- दोन्ही रकमेवर पुन्हा व्याजाचा लाभ
- गुंतवणूक + व्याज + व्याज + व्याज = चक्रवाढ

15x15x15 फॉर्म्युला लागू करा आणि पैसे कमवा?

गुंतवणूक - रु. 15,000
कालावधी - 15 वर्षे
व्याज - 15%
कॉर्पस - 15 वर्षांनी 1 कोटी रुपये
एकूण गुंतवणूक - रु. 27 लाख
चक्रवाढ - 73 लाख व्याज मिळाले

20 वर्षांसाठी गुंतवणूक? 
जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये मासिक SIPकरणार असाल तर 10 हजार रुपयांपासून सुरुवात करा. साधारणपणे म्युच्युअल फंडकरिता परतावा (returns) 12 टक्क्यांपर्यंत मिळतो. येथे तुम्हाला 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 20 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 24 लाख (10 हजार X 12 महिने = 1,20,000 X 20 वर्षे)  रुपये होईल. यावर मिळणारे व्याज 74.93 लाख रुपये असेल SIP चे एकूण मूल्य (74.93 + 24 Lakhs) 98.93 लाख रुपये होईल.  

Compounding म्हणजे काय?
कुठेतरी गुंतवणूक केल्यावर जी कमाई मिळते ती पुन्हा गुंतवणे म्हणजे Compounding असते. यामध्ये तुम्हाला मुद्दलावर व्याजावर व्याज मिळते. 

(Disclaimer: वरील गणना अंदाज म्हणून केली गेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)