Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, वाचा शिवसेनेची यादी एका क्लिकवर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोव्यात शिवसेनेचा प्रचार करणार

Updated: Jan 21, 2022, 01:12 PM IST
Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, वाचा शिवसेनेची यादी एका क्लिकवर title=

Goa Assembly Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आज आपल्या उमेदवारांची पहिली याद जाहीर केली.  गोव्यात शिवसेना १० ते १२ जागा लढवणार असून आज ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. 

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. गोव्यात शिवसेना दहा ते बारा जागा लढेल, आज नऊ उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत.   पणजीतून शैलेश वेलिंगकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय पेडणेतून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, परयेमधून गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर आणि  केपेमधून अॅलेक्सी फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे.

आदित्य ठाकरे प्रचारात उतरणार

प्रत्येक मतदार संघात शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणुका लढेल, गोव्यातील राजकारणातून सध्याची जळमट दूर करायची असतील, गोव्यातील आलेमाव गेलेमाव संस्कृती संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्यातील राजकारणात असणं गरजेचं आहे. 

गोव्याती जनतेचा आवाज, स्थानिकांचे प्रश्न, भ्रष्टाचार, राजकारणातील दंडेलशाही हे सर्व थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायला हवेत, आणि गोव्यातील जनता यावेळी शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते गोव्यात प्रचाराला येतील,  युवासेनेचे प्रमुख नेते येतील, मतदार संघात काम करतील, काही मतदार संघात शिवसेनेचे युवा मंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचारात उतरतील अशी घोषणा संजय राऊत यांनी केली. डणेतून सुभाष केरकर, म्हापसातून जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, परयेमधून गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर आणि  केपेमधून अॅलेक्सी फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे.

'गोव्यात शिवसेनेची दमदार कामगिरी'
गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा आता काही नविन पक्ष नाहीए, यश मिळालं नसले तरी शिवसेना गोव्यात दमदार कामगिरी करत आहे. गोव्याच्या निवडणुका २०१७ साली लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण, गोव्याच्या निवडणुका हे गोव्याच्या जनतेसाठी आशादायी दिसत नाही. अनेक राजकीय पक्ष नव्याने उतरले आहेत. उमेदवारांच्या यादी जाहीर होत आहेत, कोण कोणत्या पक्षातून लढत आहे हे स्पष्ट होत नाहीए. 

गोव्याच्या राजकारणात आलेमाव गेलेमाव हा वाकप्रचार प्रसिद्ध झाला आहे. कधी कोण कोणत्या पक्षात आले गेले याचा आता भरवसा नाही. काहीही असो शिवसेना ही निवडणुक लढतेय, गोव्याचं राजकारण हे गेल्या काही वर्षांपासून,  पाच ते दहा प्रस्थापित लोकांच्या हातात आहे. मग ते भूमाफिया आहेत, धनदांडगे आहेत, राजकीय घराणी आहेत. त्यांच्यात सामान्य कार्यकर्त्याला कोणतंही स्थान राहिलेलं नाही.

इतक्या भ्रष्ट पद्धतीने गोव्याच्या निवडणुका लढल्या जातात आणि राज्य चालवलं जातं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं प्रस्थापितांना घरी बसवायचं असेल, तर जनतेतल्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसला राजकारणा आणून ताकद दिलेली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय, अनेक मतदार संघात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे, जाहीरनामा लवकरच आम्ही जाहीर करु, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं