मुंबईत चोऱ्या वाढल्या अन् आयडिया गवसली; इंग्रजांच्या नाकावर टिच्चून उभारली कोट्यवधींची कंपनी

Success Story Of Godrej: देशातील सर्वात जुनी कंपनी आता वाटणीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, ही कंपनी कशी सुरू झाली याची कहाणीही भन्नाट आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 3, 2023, 02:20 PM IST
मुंबईत चोऱ्या वाढल्या अन् आयडिया गवसली; इंग्रजांच्या नाकावर टिच्चून उभारली कोट्यवधींची कंपनी title=
Godrej Group nears business split read the success story Ardeshir Godrej

Success Story Of Godrej: 126 वर्ष जुन्या असलेल्या एका नामांकित कंपनीचे हिस्से करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह भारतातील प्रत्येक घरात या कंपनीची एकतरी वस्तू सापडतेच. आज आपण गोदरेज कंपनीचा जन्म कसा झाला हे आपण जाणून घेणार आहात. मजबूती आणि विश्वसार्हतेचे दुसरे नाव म्हणून गोदरेज. मुलीच्या लग्नासाठी कपाट खरेदी करायचे असो किंवा दुकानासाठी तिजोरी घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले गोदरेजच्या कपाटांचे नाव समोर येते. भारतातील करोडो लोकांचा फेव्हरेट ब्रँड आहे गोदरेज. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या 50 वर्षांपूर्वी म्हणजेच जवळपास 126 वर्षांपूर्वी या कंपनीची स्थापना झाली आहे. 

गोदरेज या कंपनीचा जन्म आणि विस्तार कसा झाला याची कहाणी खूपच रोचक आहे. इंग्लंडची राणी भारत दौऱ्यावर असताना त्यांनी देखील कंपनीचे एक प्रोडक्ट वापरले होते. इतकंच न्वहे तर रविंद्र नाथ टागोर आणि अॅनी बेझेंट यांचा पाठिंबा या कंपनीला मिळाला होता. इंग्लंडमधून आयात करण्यात येणाऱ्या कुलुपांपेक्षा जास्त मजबूत कुलूप त्याकाळी गोदरेज कंपनी बनवत होते. एका छोट्याशा जागेतून कंपनीचा कारभार चालत असे. 

आर्देशिर गोदरेज यांनी या कंपनीची स्थापना केली. आर्देशिर यांचे पहिले ध्येय हे वकिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी हे ध्येय सोडून 7 मे 1897 रोजी एका छोट्याशा जागेतून गोदरेज ग्रुपची सुरुवात केली. परदेशात तयार होणाऱ्या कुलुपांमध्ये एक इंटिग्रेटेड स्प्रिंग असते पण ती सतत तुटली जाते. त्यावर त्यांनी उपाय शोधून काढला. त्यांची कुलुपे इंग्लंडवरुन आयात होणाऱ्या कुलुपांच्या तुलनेत अधिक स्वस्त असत. मजबूती आणि स्वस्त असल्याने त्यांच्या कंपनीचे कुलुपांची अधिक प्रमाणत विक्री होऊ लागली. 

एकाकाळी मुंबईत चोऱ्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले. वर्तमानपत्रातही या बातम्या वरचेवर छापून येऊ लागल्या.  या बातम्या व घटना पाहून 1923 साली आर्देशिर यांना एक आयडिया सुचली. त्यांनी कपाट बनवण्यास सुरुवात केली. कुलुप, कपाटं यानंतर गोदरेजने साबण बनवण्यास देखील सुरुवात केली. प्राण्यांची चरबी नसलेला जगातील हा पहिला साबण होता. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांचा व्यापार व कंपनी अधिक तेजीत आली. 

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणुका 1951 साली पार पडल्या. या निवडणुकांसाठी जवळपास 17 लाख बॅलेट बॉक्स गोदरेज कंपनीने बनवले होते. यानंतर गोदरेज कंपनीने फ्रीजसह अन्य प्रोडक्ट बनवण्यासही सुरुवात केली.