सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं

गुरुवारी सोन्याच्या दरात घट झाल्याने आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 6, 2017, 06:14 PM IST
सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं title=
Representative Image

नवी दिल्ली : गुरुवारी सोन्याच्या दरात घट झाल्याने आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा ७५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोनं प्रति तोळा ३०,४५० रुपयांवर पोहोचलं आहे. तर, गुरुवारी सोन्याच्या दरात २२५ रुपयांनी घट झाली होती त्यामुळे सोनं प्रति तोळा ३०,३७५ रुपयांवर पोहोचला होता.

स्थानिक ज्वेलर्स आणि खरेदी करणाऱ्यांच्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या किंमतीतही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी चांदी १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव प्रति तोळा ४०,१०० रुपयांवर पोहोचला आहे.

बाजारातील तज्ञांच्या मते, अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच सोन्याच्या किंमतीत बदल झाल्याचं बोललं जात आहे. यासोबतच सणासुदीत ग्राहकांची मागणीही वाढत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं ७५ रुपयांनी महागलं. त्यामुळे सोन्याचा दर ३०,४५० रुपये आणि ३०,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

सणासुदीत सोन्याची मागणी वाढत असते त्यामुळे येत्या काळात सोन्याची किंमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.