सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 30, 2024, 11:23 AM IST
सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली;  24 कॅरेटचा भाव जाणून घ्या title=
Gold and silver prices today on 29 May check rate in your city

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, आज सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे. त्याचबरोबर काल चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आज मात्र चांदीचा दर 1500 रुपयांनी खाली घसरला आहे. तर, सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. 

डॉलरच्या मजबूतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सकाळी 10च्या सुमारास वायदे बाजारात सोन्याच्या दरात 140 रुपयांची घसरण झाली होती. तर, शेवटच्या व्यवहारात सोनं 72760 रुपयांवर स्थिरावले. त्याचबरोबर चांदीचा भाव 1292 रुपयांच्या घसरणीसह 94,870 रुपयांवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. डॉलरची मजबूती आणि यूएसच्या 10 वर्षांच्या रोखे उत्पन्नात वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड 1 टक्क्यांनी घसरून 2,338 डॉलर प्रति औंस झाले. तर यूएस सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी घसरून २,३६१ डॉलर प्रति औंस झाला.

सोन्याच्या आजचा भाव काय?

गुडरिटर्न्सनुसार, आज बुधवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 72,760 इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 66,700 रुपये इतका आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांनी उतरला आहे. 

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट  66,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  72,760  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54, 570 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 670 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 276 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 457 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 360 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,208 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,656  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  66, 700 रुपये
24 कॅरेट-  72, 760   रुपये
18 कॅरेट-  54, 570 रुपये