सोनं-चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ

लग्न सराईचा काळ सुरु झाला असतानाच आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 14, 2018, 12:01 AM IST
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ title=
Representative Image

नवी दिल्ली : लग्न सराईचा काळ सुरु झाला असतानाच आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात झाली वाढ

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,७५० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचा दरही वाढला

शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाल्याने चांदी ३९,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात इतर मुद्रांच्या तुलनेत डॉलरची किंमत किंचीत घसरली आहे. तसेच स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी वाढली आहे त्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात १.१७ टक्क्यांची वाढ होत ते १,३३७ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात १.४४ टक्क्यांनी वाढ होत १७.२१ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: ३०,७५० रुपये आणि ३०,६०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.