लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 5, 2018, 10:40 PM IST
लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ title=
Representative Image

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सोन्याच्या दराने केली ३० हजारी पार

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १३५ रुपयांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,५०० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीही चमकली

शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४०,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात ०.७२ टक्क्यांची वाढ होत ते १,३२२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात ०.५८ टक्क्यांनी वाढ होत १७.२० डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात १३५-१३५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: ३०,५०० रुपये आणि ३०,३५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.