Gold News : सोन्याच्या दरात घसघशीत वाढ; पण 'ही' कृती करुन राहा निश्चित

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी 

Updated: Oct 20, 2021, 09:26 AM IST
Gold News : सोन्याच्या दरात घसघशीत वाढ; पण 'ही' कृती करुन राहा निश्चित

मुंबई : यंदाच्या वर्षी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. याच मुख्य कारण म्हणजे कोविड. कोविडमुळे सोन्याच्या मागणीला मोठा फटका बसला आहे. यंदा सोन्याची मागणी कमी झाली. यामुळे 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

डब्ल्यूजीसीच्या मते, कोरोनाविरूद्ध लढा अजूनही भारतात सुरू आहे. ज्याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर दिसून येत आहे. भारतात सोन्याच्या आयातीची मागणी वाढत असली तरी किरकोळ खरेदी मात्र मंद आहे. आता जेव्हा कोरोनावरील सर्व निर्बंध आणि निर्बंध झपाट्याने शिथिल केले जात आहेत. तेव्हा किरकोळ मागणीतही तेजी येण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, हा बदल या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी दिसणार आहे.

रिपोर्टमध्ये महत्वाची माहिती

वर्ष 2022 मध्ये आर्थिक गोष्टीत मोठे बदल होणार आहेत. कोरोनाचे परिणाम कमी होतील आणि त्यानुसार सोन्याच्या मागणीत मोठी उडी दिसेल. जर या दरम्यान कोविडचा संसर्ग पुन्हा वाढला तर सोन्याच्या मागणीवर अनिश्चितते बदल होऊ शकतात. जर भारतीय उद्योगाने परदेशी उद्योगाच्या विरोधात स्वतःला तयार केले आणि परिस्थिती सकारात्मक राहिली तर सोन्याच्या मागणीत मोठी तेजी दिसून येईल. देशातील लोकांचे उत्पन्न वाढेल तशी सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असते.

मागणी वाढल्यावर किंमती वाढणार 

भारतातील सोन्याची मागणी आणि लोकांचे उत्पन्न यांच्यात थेट संबंध असल्याचे अहवालात म्हटले आहे. जर उत्पन्न वाढले, कमाईत वाढ झाली, तर सोन्याची खरेदीही वाढते. कोविड महामारीमध्ये, उत्पन्न कमी झाले आहे.  ज्यामुळे सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. पुढच्यावर्षी कोरोनाचा प्रभाव राहिला नाही, तर सोन्याची मागणी नक्कीच वाढेल.यावर्षी सणासुदीच्या काळात सोन्याच्या विक्रीत मंदी आहे कारण लोक अद्याप कोरोनाच्या प्रभावातून सावरलेले नाहीत. पुढील वर्षी आर्थिक वाढ झपाट्याने वाढेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे सोन्याची मागणीही वाढेल