गोल्ड हॉलमार्किंग! नवीन नियम किती फायद्याचे? घरातील जुन्या दागिन्यांवर काय परिणाम?

केंद्र सरकारने गोल्ड ज्वेलरी हॉलमार्किंग अनिवार्य केल्याची तारीख 15 जूनपर्यंत वाढवली आहे. 15 जूननंतर कोणत्याही सराफा व्यापाऱ्याला विना हॉलमार्कचे दागिने विकता येणार नाही.

Updated: May 27, 2021, 07:14 PM IST
गोल्ड हॉलमार्किंग! नवीन नियम किती फायद्याचे? घरातील जुन्या दागिन्यांवर काय परिणाम? title=
representative image

मुंबई : केंद्र सरकारने गोल्ड ज्वेलरी हॉलमार्किंग अनिवार्य केल्याची तारीख 15 जूनपर्यंत वाढवली आहे. 15 जूननंतर कोणत्याही सराफा व्यापाऱ्याला विना हॉलमार्कचे दागिने विकता येणार नाही. ज्वेलर्सने नियमांचं पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान ग्राहकांना हे माहित हवं की, हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यानंतर त्यांचा काय फायदा होणार आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावरही पडणार आहे.
तुमच्या घरात जुने परंपरागत सोन्याचे दागिने असतील तर त्यांना विकता येईल का? असे अनेक प्रश्न आहेत... जाणून घेऊया

ग्राहकांना मिळेल शुद्ध सोने? 

गोल्ड हॉलमार्किंगच्या मागे सरकारचा हेतू ग्राहकांना शुद्ध सोने मिळणे हा आहे. नव्या नियमांनंतर BIS HALLMARK असलेलेच सोन्याचे दागिने विकले जातील. हे सोने 14, 18 आणि 22 कॅरेट मध्ये असतील. 

ग्राहकांना द्यावा लागेल चार्ज

हॉलमार्क असलेली सोन्याच्या दागिन्यांचा चार्ज ग्राहकांनाच द्यावा लागणार आहे. हा चार्ज खुप कमी असणाऱ आहे. हा चार्ज सोन्याच्या तुकड्यांच्या हिशोबाने नाही, तर एकून दागिन्यांच्या वजनावर असणार आहे.

घरात ठेवलेल्या सोन्याचे काय?

सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क अनिवार्य झाल्यानंतर हा महत्वाचा प्रश्न विचारला जात आहे की, घरात जुने पारंपारिक सोन्याचे दागिने असतील तर त्याचे काय करायचे?

त्याच्या विक्रिवर परिणाम होईल का? 

तर, हॉलमार्कच्या निर्णयाचा परिणाम घरातील सोन्यावर होणार नाही. जुन्या दागिन्यांच्या विक्रीवरही काहीही परिणाम होणार नाही. ते दागिने तुम्हाला सराफा व्यवसायिकांना नेहमीप्रमाणे विकता येतील. परंतु ज्वेलर्सला विना हॉलमार्कचे सोने विकता येणार नाही.