Gold Rate : एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, 24 ते 18 कॅरेटचे जाणून घ्या दर

काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या...

Updated: Sep 16, 2021, 04:32 PM IST
Gold Rate : एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, 24 ते 18 कॅरेटचे जाणून घ्या दर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार होत आहेत. सराफ बाजारात सोन्याचे दर बुधवारच्या तुलनेत 416 रुपयांनी घसरले आहेत. सोन्याच्या दरामध्ये आज घट झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचं वातावरण आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार रुपयांपेक्षा कमी आली आहे.

24 कॅरेट सोनं घेणाऱ्यांना 10 ग्रॅमसाठी आता 46839 रुपये मोजावे लागणार आहे. बुधवारी 47, 255 रुपयांवर पोहोचलेले सोन्याचे दर आज 46 हजारांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 62532 रुपये किलो आहेत. आज 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जनही आहे. सोन्याचे दर घसरल्याने आता पुन्हा एकदा ग्राहक सोनं खरेदी करण्याकडे वळताना पाहायला मिळाले आहेत.

आजचे सोन्याचे दर

Gold 999 (24 कॅरेट)- 46 हजार 839 रुपये प्रति तोळा 47255 -416
Gold 995 (23 कॅरेट)- 46 हजार 651 रुपये प्रति तोळा 47066 -415
Gold 916 (22 कॅरेट)- 42 हजार 905 रुपये प्रति तोळा 43286 -381
Gold 750 (18 कॅरेट)- 35 हजार 129 रुपये प्रति तोळा 35441 -312
Gold 585 ( 14 कॅरेट)- 27 हजार 401 रुपये प्रति तोळा 27644 -243
Silver 999 प्रति किलो- 62532

बुधवार (15 सप्टेंबर ) सोन्याचे दर

Gold 999 (24 कॅरेट)- 47 हजार 255 रुपये प्रति तोळा
Gold 995 (23 कॅरेट)- 47 हजार 066 रुपये प्रति तोळा
Gold 916 (22 कॅरेट)- 43 हजार 286 रुपये प्रति तोळा
Gold 750 (28 कॅरेट)- 35 हजार 441 रुपये प्रति तोळा
Gold 585 ( 14 कॅरेट)- 27 हजार 644 रुपये प्रति तोळा
Silver 999 प्रति किलो- 63081

गेल्यावर्षापासून सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांनी घट झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रती तोळा इतक्या दरावर पोहोचलं होतं. त्यामुळं आताचे आकडे आणि घट झालेले दर पाहता यामध्ये मोठा फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळताना दिसत आहेत.