मुंबई : मंगळवारी घरगुती बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर ऑगस्टमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्यात 51 रुपयांची वाढ झाली आहे. सकाळी 10 वाजता 190 रुपये म्हणजे 0.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 47489 रुपये आहे. (Gold Price Today, 6 July 2021: Gold prices see a hike but remain below Rs 47000)
सकाळी सोन्याचा दर 47524 रुपयांचा उच्चांक होता तर 47350 रुपये हा निच्चांक होता. तर दुसरीकडे चांदीची किंमत देखील वाढली आहे. सप्टेंबरमध्ये चांदीच्या दरात 252 रुपये वाढ पाहायला मिळाली. यावरून चांदीचा दर 70291 रुपये प्रति किलो ट्रेड आहे.
वैश्विक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर 69 रुपयांनी वाढून 46408 रुपये 10 प्रति ग्रॅम पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या दिवसात 10 ग्रॅम सोन्याचा दर 46339 रुपयांवर बंद झाला. चांदीचा दर 251 रुपयांनी महागला असून 69035 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांत हा दर 68784 रुपयांवर गेला होता.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचून वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.
सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर चांगला सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.