Gold Silver Price on 29 May 2023 : सध्या भारतात लग्नसराई सुरु झाली असून या काळात सोने-चांदीच्या (Gold Silver Price) खरेदीला प्रचंड मागणा वाढली. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज सुरुवातीच्या टप्प्यात वाढ झाली असताना 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 59,570 रुपये आहे. तर मागील व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 59,560 वर बंद झाली होती. सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 71,350 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचे दर 71,350 रुपये प्रति किलो होता.
नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू झाला असून आज नवीन व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस आहे. मागील व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला, सराफा बाजारात सोन्याच्या तसेच चांदीच्या (Gold Silver rate) किंमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. अशा परिस्थितीत आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. दरम्यान इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. म्हणजेच दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आता सोन्या-चांदीचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहे.
वाचा : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील दर
गेल्या शुक्रवारी (26 मे 2023) सोने प्रति 10 ग्रॅम 219 रुपयांनी स्वस्त झाले आणि 60142 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याआधी, गुरुवारी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, सोने प्रति 10 ग्रॅम 319 रुपयांनी स्वस्त झाला आणि 60361 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले. तर दुसरीकडे, सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही शुक्रवारी वाढ झाली. शुक्रवारी चांदीचा भाव 215 रुपयांनी वाढून 70,500 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर गुरुवारी चांदी 944 रुपयांनी स्वस्त होऊन 70285 रुपये किलोवर बंद झाली.
सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,606 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दर 54,606 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,570 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,606 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,570 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,606 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,570 रुपये आहे.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल देऊन दर जाणून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात एसएमएसद्वारे माहिती मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.