स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, १० दिवसांत ७ वेळा झाली घट

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ होत असताना नागरिकांना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 17, 2018, 12:24 PM IST
स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, १० दिवसांत ७ वेळा झाली घट title=

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ होत असताना नागरिकांना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्याचं दिसत आहे. चार महानगरांमध्ये गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ७ वेळा कपात करण्यात आली आहे.

इतके कमी झाले दर

पेट्रोलचा विचार केला तर, ७ फेब्रवारी पासुन आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत १ रुपया १५ पैशांनी कपात झाली आहे. शनिवारी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७२.२३ रुपये आहे. 

डिझेलच्या दरात कपात

७ फेब्रुवारीपासुन आतापर्यंत डिझेलच्या दरात १.४६ रुपये प्रति लीटरने कपात झाली आहे. शनिवारी दिल्लीत एक लीटर डिझेलची किंमत ६२.७६ रुपये आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतीत घट 

गेल्या महिन्यात कच्च्या तेलाचा दर ७१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत क्रुडचा दर ६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी याचा दर ६४.३३ डॉलर प्रति बॅरल झाला.

उत्पादन शुल्कात कपात

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत होती आणि त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. त्यानंतर केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये प्रति लीटर २ रुपये उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती.