नवी दिल्ली : जीएसटी दरात सरकारने केलेली कपात बुधवार १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. यात रेस्टोरेंट मधील जेवणाबरोबरच घरगुती सामान देखील स्वस्त झाले आहे. आता रेस्टोरेंट मध्ये खाल्यावर १८% ऐवजी ५% टॅक्स लागणार आहे. याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. गेल्या काही दिवसांपासून असलेला हा टॅक्स एकदम कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
याव्यतिरिक्त पास्ता, मियोनी, कंडेंस्ड मिल्क, जूट बॅग आणि चष्म्याच्या फ्रेमवरील जीएसटी दार १८% हून कमी करून १२% करण्यात आला आहे. इडली, डोसा, बटर वरील १२% टॅक्स कमी करून ५% करण्यात आला आहे.
असा होणार फायदा :
तुम्ही जर रेस्टोरेंटमध्ये १००० रुपयांचे जेवण जेवला असाल तर जुन्या टॅक्सनुसार तुम्हाला बिलावर १८% टॅक्स द्यावा लागला असता. या १८% मध्ये ९% CGST आणि ९% SGST असेल. अशाप्रकारे १००० रुपयांच्या जेवणावर १८० रुपये टॅक्स भरावा लागला असता. म्हणजे तुमचे बिल झाले असते एकूण ११८० रुपये.मात्र आता नव्या टॅक्सनुसार तुम्हाला १००० रुपयांच्या बिलावर ५% टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे ५० रुपये अधिक द्यावे लागतील. या हिशोबाने तुम्हाला १००० रुपयांच्या बिलावर तुमचे १३० रुपये वाचतील.
यात देखील दिलासा :
७५०० रुपये किंवा त्याहून अधिक रूम रेंट असलेल्या हॉटेलमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर जीएसटीचा दर १८% करण्यात आला आहे. यापूर्वी जीएसटी नॉन एसी रेस्टोरेंटमध्ये १२% आणि एसी रेस्टोरेंटमध्ये १८% जीएसटी लावला जात होता. तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा दर २८% होता.
हे पदार्थ झाले स्वस्त :