हरयाणाा : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात महत्मा गांधींचे अमूल्य योगदान आहे. अहिंसावादी महात्मा गांधींची ओळख भारतासह जगाला आहे. मात्र त्यांच्या पश्च्यात त्यांच्या कुटुंबीयांकडे मात्र अनेकांचे दुर्लक्ष होत आहे.
दैनिक भास्करच्या बातमीनुसार, महात्मा गांधीच्या नातसुनेवर सध्या इतरांचा आश्रय घेऊन रहाण्याची वेळ आली आहे.
शिवा लक्ष्मी या महात्मा गांधींजीच्या नातसून आहेत. गांधींजीचे नातू कानूभाई यांच्या पत्नी म्हणजे शिवालक्ष्मी. ९२ वर्षीय शिवा लक्ष्मी यांची दृष्टी अधू झाली असली तरीही त्यांची स्मरणशक्ती अजूनही तल्लख आहे.
दिल्लीपासून सुमारे ५० किमी दूर कादीपूर या गावामध्ये शिवा लक्ष्मी राहतात. तीन वर्षापूर्वी अमेरिकेहून कानूभाई आणि शिवा लक्ष्मी परत आल्या होत्या. त्यावेळे कानू गांधी यांची तब्येत खूपच खराब झाली होती.
कानू गांधी अमेरिकेमध्ये नासात वैज्ञानिक होते तर शिवा लक्ष्मी बोस्टन बायोमेडिकल रिसर्च इंस्ट्रिट्युट मध्ये प्रोफेसर होत्या.
सुरूवातीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने कानू गांधींना आजारपणाच्या काळात मदत केली होती. त्यानंतर कानू गांधींचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणी पाहिले देखील नाही. सरकारला आपला विसर पडल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.
सध्या शिवा लक्ष्मी त्यांच्या मित्रपरिवारातील एका व्यक्तीकडे राहतात. कानू गांधींच्या निधनानंतर त्यांनी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली. मात्र कालांतराने आरटीआई एक्टिविस्ट हरपाल राणा यांनी शिवा लक्ष्मींना आपल्या घरी आणले.
शिवा लक्ष्मीच्या वडीलांची आणि गांधी परिवाराची ओळख सुमारे 1930 च्या आसपास झाली. त्यादरम्यान तुम्हांला श्रीमंतीचा, ऐशोरामाचा त्याग करावा लागेल असे गांधींजींनी सांगितल्यानंतर सारे सोडल्याची माहिती शिवा लक्ष्मी यांनी दिली आहे.
शिवा लक्ष्मी यांचे दीर गोपाल गांधींशी त्यांचा संपर्क नसल्याचे त्यांनी सआंगितले आहे. दरम्यान गोपाल गांधी हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीतील एक नाव होते.