वऱ्हाड्यांसमोर मेहुणीनं केलं असं काही की पाहून लाजला नवरदेव, पाहा व्हिडीओ

साधीसुधी नव्हे, चाप्टर मेहुणी.... साली नही भोलीभाली... एकदा हा व्हिडीओ पाहाच

Updated: Sep 1, 2021, 08:26 PM IST
वऱ्हाड्यांसमोर मेहुणीनं केलं असं काही की पाहून लाजला नवरदेव, पाहा व्हिडीओ title=

नवी दिल्ली: लग्नातील अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कधी मित्र-मंडळी मजा करताना तर कधी रुसवे फुगवे काढतानाचे हे मजेशीर व्हिडीओ लोकांनी पाहायला आवडतात. पण आता सोशल मीडियावर एक मेहुणा आणि नवरदेवाचा व्हिडीओ सगळ्याचं फुटेज खाऊन गेलाय. या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वऱ्हाडी मंडळींसमोर मेहुणीनं नवरदेवाला मिठाई भरवण्यासाठी हात पुढे केला. थोडी लाजली आणि नवरदेवानं मिठाई खाण्यासाठी तोंड उघडताच मेहुणीनं जे केलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मेहुणीनं केलेली ही मस्करी पाहून युझर्सनाही हसू आवरलं नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओला तुफान पसंती मिळाली आहे. 

मेहुणीनं मिठाई भरवण्याऐवजी स्वत:चं खाऊन टाकली. तिने मिठाई फस्त केल्याचं पाहून नवरदेव नवरदेवाला लाज वाटली. त्याने मान खाली घातली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

निरंजन महापात्रा नावाच्या एका व्यक्तीनं हा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओला 12 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. हजारो लोकांनी पाहिला आहे. या मेहुणीची मस्करी युझर्सना आवडली आहे.