Video : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

Viral Video : सोशल मीडियावर एका नवरदेवाची जोरदार चर्चा रंगली आहे. या नवरदेवाने वरातीत गाणं गायलं आणि हे काय ऐकणारा प्रत्येक आश्चर्यचकित झाला. तुम्ही देखील एकदा ऐकाच या नवरदेवाचं गाणं. 

नेहा चौधरी | Updated: Oct 3, 2023, 11:40 PM IST
Video : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक् title=
Groom Singing madhuri dixit song mungda mungda in female voice video viral trending now

Groom Singing Trending Video : लग्न म्हटलं की, नाच गाणे आलंच...आणि हे लग्न नवरेदवाचं असेल तर वरातीशिवाय लग्न पूर्णच होणार नाही. बँड बाजा आणि बरात तर असायलाच हवी. नवरेदव घोडीवर असेल आणि त्याचे नातेवाईक, मित्र परिवार गाण्यावर नाचत नवरीला आण्यासाठी लग्नमंडपाकडे जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वरातील नवरदेवाची जोरदार चर्चा रंगली आहे. या वरातीत खुद्द नवरदेव गाणं गातो. अहो त्यात काय एवढं असं तुम्ही म्हणाल. पण हा नवरदेव जेव्हा गाणं गातो, तेव्हा वरातीतील पाहुणे मंडळी अवाक् होऊन जातात. सोशल मीडियावर या नवरदेवाने धूम केली आहे. (Groom Singing  madhuri dixit song mungda mungda in female voice video viral trending now)

आत्मनिर्भर दूल्हा!

या व्हायरल व्हिडीओमधील तो नवरदेव हातात माइक घेते. तेव्हा वऱ्हाडी सगळे त्याच्याकडे कुतूहलाने पाहतात. याची गाण्याची खास शैली पाहून प्रत्येकांच्या भुवया उंचावतात. तो माइक घेतो आणि माधुरी दीक्षितचे 'तू मुंगडा, मुंगडा मैं गुर की डाली' हे गाणे गाऊ लागतो. त्याची ही खासयित पाहून त्या नवरदेवाच्या बाजूला उभे असलेले वृद्ध काकादेखील अवाक् होता. त्या नवरदेवाचं टॅलेंट पाहून सगळे प्रभावित होतात. गाणे ऐकताच सगळे जोरदार टाळ्या वाजवतात. एवढंच नाही तर एका व्यक्तीने पैसे काढून त्यावर ओवाळून टाकले. नवरदेवाच्या या कृत्याने एकंदरीत सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @sarif_video

हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरींना आपलं हसू आवरत नाही आहे. या व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @sarif_video नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टसोबत एक मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. माझा देश बदलतोय. या व्हिडीओवर यूजर्सचे तुफान कंमेट्स येतं आहेत. एका यूजर्सने लिहिलं आहे की, वधू पळून गेल्यासारखं वाटतं. दुसऱ्या यूजर्सने लिहिलं आहे की, भाऊ हे तुझ्या लग्नातील उत्तम काम आहे. मुलीच्या आवाजात गाणं गाणारा हा पहिला व्यक्ती नाही. प्रत्येकात काही काही टॅलेंट असतं. या व्यक्तीचं टॅलेंट पाहून यूजर्स खूष झाले आहे. एक जण म्हणाला की, हा व्यक्ती त्याच्या लग्नात पैसे वाचवत आहे.