महागाईची झळ... जीवनावश्यक वस्तूंसोबत रुग्णालयातील उपचारही महागणार

'GST'ठरणार त्रासदायक,  जाणून घ्या कोणत्या वस्तूवर किती टक्के भरावा लागणार जीएसटी  

Updated: Jul 18, 2022, 08:07 AM IST
महागाईची झळ... जीवनावश्यक वस्तूंसोबत रुग्णालयातील उपचारही महागणार title=

मुंबई : आजपासून GST दरात बदल झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या महिन्याचं गणित कोलमडण्याची शक्यता आहे. 18 जुलैपासून जीएसटी परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. यामध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या वस्तू आणि लेबल असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे, ज्यावर 5 टक्के जीएसटी लागू होईल. आता 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने असलेल्या हॉस्पिटलच्या रूमवरही जीएसटी भरावा लागणार आहे.

याशिवाय दररोज 1000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 1000 रुपयांपेक्षा कमी दर असणाऱ्या हॉटेलच्या रुमवर कोणताही कर आकारला जात नव्हता.

'हे' असतील महत्त्वाचे बदल 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनमध्ये झालेल्या बैठकीत वस्तू-सेवाकरातील विसंगती दूर करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांवर कर आकारणीचा आणि वाढीचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बदल आजपासून लागू होणार आहेत. 

कोणत्या वस्तूंचे दर वाढणार
- पॅक केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन आणि मटार इ. यावर आता 5 टक्के जीएसटी लागणार आहे.

- टेट्रापॅकमधील वस्तू आणि चेक बुक शुल्कावर 18 टक्के जीएसटी भरावी लागणार आहे. 

- 'प्रिंटिंग/ड्रॉइंग इंक', चाकू, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, रेखांकन आणि चिन्हांकन साधने उत्पादनांवरील जीएसटी 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

- एक हजार रुपयांहून कमी भाडय़ाच्या हॉटेल रूमवरील करसवलत रद्द, आता 12 टक्के कर.

- रुग्णालयातील पाच हजार रुपयांहून अधिक भाडय़ाच्या खोलीवर 5 टक्के जीएसटी, अतिदक्षता विभागासाठी मात्र सवलत. 

कोणत्या वस्तू स्वस्त होतील?

- रोपवे प्रवासावरील कर 12 वरून 5 टक्के करण्यात करण्यात आला आहे. 

- ट्रक भाडय्याने घेण्याचा खर्च कमी करण्याल आला आहे. यासाठी आता 12 टक्के कर भरावा लगणार आहे. 

- इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के जीएसटी सवलत देण्यात आली आहे.

-ऑस्टॉमी शस्त्रक्रिया उपकरणे आजपासून स्वस्त होणार आहेत.