भारतातल्या विविध राज्यांमध्ये कसं साजरं होतं नवं वर्ष?

New Year: गुढीपाडव्याप्रमाणे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं केलं जातं.

Pravin Dabholkar | Updated: Apr 6, 2024, 06:42 PM IST
भारतातल्या विविध राज्यांमध्ये कसं साजरं होतं नवं वर्ष? title=
New Year 2024

New Year: भारत हा देश सांस्कृतिक विविधतेने नटलाय.देशातील जनता नव्या वर्षाचा महोत्सव साजरा करते. हिंदु दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याला नवं वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा करुन नवं वर्षाची सुरुवात होते, हे आपल्या साऱ्यांनाच माहिती असेल. त्याप्रमाणे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं केलं जातं.

बैसाखी, पंजाब

बैसाखी संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला साजरा केला जातो. 5 नद्यांची भूमी असलेल्या पंजाबमध्ये बैसाखखीला विशेष स्थान आहे. वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी शिख बांधव हा दिवस साजरा करतात.

जुड शीतल- बिहार

हा सण मैथिली नव वर्षे म्हणून साजरा केला जातो. बिहार, झारखंड एवढंच नव्हे तर नेपाळच्या  मैथिलीमध्ये जुड शीतल सण साजरा केला जातो. मैथिली नव वर्ष सर्वसाधारणपणे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 14 एप्रिलला साजरे केले जाते. 

बोहाग बिहू, पूर्वोत्तर भारत 

हा सण रंगोली बिहू नावाने साजरा केला जातो. या दिवशी नवं पिक येण्याचा आनंद मिठाई वाटून साजरा केला जातो. 3 दिवस येथे सण साजरा केला जातो. लोकं ढोलाच्या तालावर बिहू नृत्य करतात आणि एकत्र येऊन आनंद साजरा करतात. 

गुढी पाडवा, महाराष्ट्र

हिंदु दिनदर्शिकेनुसार गुढी पाडवा साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला हा दिवस येतो.हिंदु धर्माचे या दिवशीपासून नववर्ष सुरु होतं.

उगादी पर्व, दक्षिण भारत 

उगादी किंवा युगादी हा सण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकचे नव वर्ष आहे. पारंपारिक मिठाई वाटून सण साजरा केला जातो. यादिवशी लोक नवीन कपडे खरेदी करतात. मित्र परिवाराला गोडधोड खायला घालतात. 

जमशेदी नवरोज 

नवरोज हे ईराणी नववर्ष आहे. जे जगभरातील नृवशविज्ञानवादी समुहांकडून साजरे केले जाते. भारतात पतेतीच्या दुसऱ्या दिवशी पारसी नवरोज साजरी करतात. 

विशु, केरळ 

केरळच्या समृद्ध भूमीत पिक उगवल्याचा आनंद साजरा करत विशु उत्सव साजरा केला जातो. अगदी दिवाळीप्रमाणे हा सण साजरा होतो. आरशासमोर पिकं, भाज्या आणि हंगामी फुले ठेवून दिवसाची सुरुवात होते. या व्यवस्थेला विशु कनी म्हटलं जातं. 

पहिला बोईशाख, पश्चिम बंगाल 

पोईला बोईशाख हा सण बंगला नोबोबोरशी नावानेदेखील ओळखला जातो. हा बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस असतो, जो नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 किंवा 15 एप्रिलला हा सण साजरा केला जातो.