वलसाड : गुजरात विधानसभा निवडणुकीत पाटीदारांचं मन वळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलीच कंबर कसलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज प्रचाराचत्या रणसंग्रामात आज ची पहिली सभा दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्हातल्या धर्मापूरमध्ये झाली.
यासभेत मोदींनी काँग्रेसच्या नेतृत्वावर तुफान हल्लाबोल केला. काँग्रेसनं नेहमीच गुजरातची बदनामी केली. काँग्रेस नेतृत्व मुघलाप्रमाणे आहे. आणि आजचे नेतृत्व औरंगजेबासारखं आहे असही मोदी म्हणाले. यानंतर मोदींच्या आणखी तीन सभा होणार आहेत.
आजच्या संभानंतर मोदींच्या प्रचाराचा दुसरा टप्पा समाप्त होणार आहे. तर राहुल गांधींच्या सातव्या टप्प्यातील प्रचारसभांना उद्यापासून सुरूवात होणार आहे. कच्छपासून त्यांच्या सभांना सुरूवात होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक आहेत. कारण पहिल्या टप्प्याचे मतदान 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे सहा तारखेनंतरही मोदी आणखी काही सभा घेण्याची शक्यता आहे.