मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूक आणि हिमाचल विधानसभा निवडणूकीच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे.
गुजरातमध्ये १८२ जागांसाठी मतदान झाले तर हिमाचलमध्ये ६८ जागांसाठी मतदान झाले. निकाल पाहता या दोन्ही विधानसभा निवडणूकीतून भाजपाला आनंदवार्ता मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही जागेवर भाजपाला विजय मिळत असल्याचं चित्र आहे. अशात सोशल मीडियावर अनेक राजकीय दिग्गज मंडळींनी भाजपाला विजय बहुतांश मिळालाच आहे या संकेताने शुभेच्छा दिल्या आहेत.
आज के #ElectionResults में विजय के लिए @BJP4India को बधाई @INCIndia को बेहतर विपक्षी संघर्ष प्रस्तुत करने हेतु शुभकामनाएँ.आशा है देश की राजनीति और राजनेता इन दोनों चुनावों से सकारात्मक सबक़ और संकेत लेगें.गुजरात @AamAadmiParty प्रत्याशियों के एकात्म संघर्ष को प्रोत्साहन
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) December 18, 2017
तिथेच आम आदमीचे नेता कुमार विश्वास यांनी भाजपला विजयासाठी अभिनंदन करणारे ट्विट केले असून काँग्रेसने गुजरातमध्ये भाजपाला चांगली टक्कर दिल्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. निकाल हाती यायल्या सुरूवात झाल्यावर काँग्रेस पुढे असल्याचं दिसत होत. मात्र जस जसे निकाल हाती येऊ लागले तेव्हा कळलं की भाजप पुढे आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीला कुणी थांबवू शकत नाही हे स्पष्ट झालं आहे.
भाजपचं अभिनंदन करताना कुमार विश्वास असं लिहितात की, आजच्या निकालासाठी भाजपाला विजयासाठी शुभेच्छा आणि काँग्रेसला उत्तम संघर्ष केल्यामुळे शुभेच्छा. आशा आहे की देशातील या राजकारणातून नेते मंडळी सकारात्मक धडा घेतील.
I’m done with #Election2017. Gujarat hasn’t been a disaster for the Congress & it hasn’t been the emphatic victory the BJP wanted. Take from it what you will. Over & out!
— Omar Abdullah (@OmarAbdullah) December 18, 2017
जम्मू काश्मिरचे पूर्व मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाह यांनी लिहिलं आहे की, माझ्यासाठी निकाल पूर्ण झाला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने काही फार परिणाम दाखवला नाही. मात्र, भाजापाने आपला विजय मिळवला आहे. या निकालातून प्रत्येकाला जसा अर्थ काठता येईल तसा काठू शकता.
I put on record that 95+_ was predicted throughout to me by Nalapat and my daughter Suhasini. Foreigners: 80+_. Ram Mandir is the difference
— Subramanian Swamy (@Swamy39) December 18, 2017
2019 will be perhaps soft bogus Hindutva + failing economy versus genuine hindutva and anti corruption
— Subramanian Swamy (@Swamy39) December 18, 2017
तिथेच भाजपचे सुब्रहमण्यम स्वामी यांनी लिहिले आहे की, मी नेहमीच सांगत आलो होतो की, आम्हाला ९६ जागांहून अधिक ठिकाणी विजय मिळेल. आणि विदेशींना ८० हून अधिक. राम मंदिराचा मुद्दा हा मोठा मुद्दा राहिलेला आहे. यासोबतच भाजपाने २०१९ च्या निवडणूकीची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की. २०१९ ची निवडणूक ही हिंदुत्व आणि अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणार आहे. ही निवडणूक एँटी करप्शनच्या मुद्यावर असणार आहे.
रूझानोंच्या म्हणण्यानुसार गुजरात विधानसभा निवडणूकीच्या १८२ जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. ही मतमोजणी ३३ जिल्ह्यात कडक सुरक्षेत ३७ केंद्रांवर एक साथ होत आहे. गुजरातच्या दोन चरणांमध्ये १८२ जागांसाठी निवडणूका झाल्या असून ६८.४१ टक्के मतदान झाले आहेय २०१२ मध्या भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवलला होता. तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळविला आहे. उत्तर गुजरातमध्ये ३२ जागांवर विजय असून दक्षिण गुजरातमध्ये ३५, सौराष्ट्रमध्ये ५४ तर मध्य गुजरातमध्ये ६१ जागांवर विजय मिळविला आहे.