मुंबई : 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे देखील वाढदिवस असतात.
याच दिवशी एका वृद्ध महिलेचा देखील वाढदिवस असतो. यंदा या महिलेने आपला 107 वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी त्यांची इच्छा होती की, त्यांना एका खास व्यक्तीने शुभेच्छा द्याव्यात. तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितले की, त्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा आहे.
Today my grandmother turned 107. Her one wish. To meet @OfficeOfRG Rahul Gandhi ! I asked her why? She whispers ... He's handsome ! pic.twitter.com/k3wUaSMKfE
— Dipali Sikand (@SikandDipali) December 25, 2017
तेव्हा नातीने विचारले की, तुला का राहुल गांधीला भेटायचं? या प्रश्नावर आजी अगदी लाजत म्हणाली की, राहुल गांधी खूप 'हँडसम' आहे. यावर नात दीपाली सिकंदने राहुल गांधी यांना ट्विटर हँडलवर टॅग करत आपल्या आजीची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अवघ्या काहीशा तासात राहुल गांधी यांनी ट्विवटरच्या माध्यमातून उत्तर दिले की, डिअर दिपाली, माझ्याकडून तुझ्या आजीला वाढदिवसाच्या आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा दे.
Today my grandmother turned 107. Her one wish. To meet @OfficeOfRG Rahul Gandhi ! I asked her why? She whispers ... He's handsome ! pic.twitter.com/k3wUaSMKfE
— Dipali Sikand (@SikandDipali) December 25, 2017
एवढंच नाही तर राहुल गांधींनी प्रत्यक्षात आजीला फोन करून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. तेव्हा दिपालीने आजीचं राहुलसोबत बोलणं देखील करून दिलं. राहुल गांधीच्या या गोष्टीमुळे ट्विटरवर भरपूर चर्चा झाली. राहुल गांधी ट्विटरवर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.
उल्लेखनीय बाब म्हणजे 16 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान हाती घेतली. देशातील सर्वात जुन्या पक्षाने बदलत्या काळाप्रमाणे कात टाकली आहे. या पक्षाने देखील सोशल मीडियाचे महत्व ओळखून त्याचा विचार करण्यास सुरूवात केली आहे. तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या टिकांना देखील ते चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. एवढंच काय तर राहुल गांधी यांचे तब्बल 50 लाख फॉलोअर्स सोशल मीडियावर आहेत.