मुंबई : सध्या Reels चा जमाना आहे, असं म्हणायला हरकत नाही. इन्स्टाग्राम, फेसबुक असो किंवा मग You Tube. प्रत्येक ठिकाणी लांबलचक व्हिडीो पाहण्यापेक्षा सध्या व्ह्युअर्स रील्सना पसंती देताना दिसत आहेत. मनोरंजन, लाईफस्टाईल, विनोदी, फिरण्यासंबंधीचे असे असंख्य रील्स सध्या उपलब्ध आहेत. यातच माहिती देय रील्सना मिळणारी पसंती काही औरच.
सोशल मीडियावर स्क्रोल करता करता असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही जे काही पाहताय त्यावर क्षणार्धासाठी विश्वासच बसत नाहीये. (have you spot indian currency Hidden Secret on 20 rs note RBI)
रोजच्या वापरात येणाऱ्या, व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या 20 रुपयांच्या नोटबाबतचा हा व्हिडीओ. तुम्ही 20 रुपये वापरून अनेकदा ते खर्च केले असतील, कोणा दुकानदाराने ते तुम्हाला सुटे पैसे म्हणूनही परत दिले असतील. तिथून या नोटचा प्रवास तुमच्या हातापासून ते खिशापर्यंत किंवा पाकिटापर्यंत इतकाच.
कधी हीच नोट तुम्ही निरखून पाहिलीये?
तुमच्याकडे जर 20 रुपयांची नोट असेल, तर त्यावर ज्या बाजूला गांधीजींचं चित्र आहे, त्याच चित्रामध्ये काही अशी अक्षरं दडलीयेत जी आतापर्यंत तुम्हाला दिसलीच नसतील. ही अक्षरं आहेत RBI.
भारतीय रिझर्व्ह बँकेची आद्याक्षरं 20 रुपयांच्या या नोटवरही पाहायला मिळत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याच्या दांडीवर अतिशय लहानशी अशी ही अक्षरं पाहताक्षणीच अनेकजण थक्क होत आहेत. तुम्हाला दिसली का ही अक्षरं? वाट कसली बघताय? आताच तुमच्या ओळखीच्यांनाही सांगा ही गंमत.