मुंबई : एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूढे आरटीजीएस, एनईएफटीचे व्यवहार बँकेने विनामूल्य केले आहेत.
चेकद्वारे होणारे व्यवहार शुल्क पुढील महिन्यापासून वाढविण्याचा निर्णयही घेतला आहे.
> बँकेने जारी केलेल्या निवेदनाच्या अनुसार, ग्राहकांना आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे ऑनलाइन व्यवहारांसाठी १ नोव्हेंबरपासून शुल्क आकारण्यात येणार नाही.
> बँकेच्या ग्राहकांना याआधी आरटीजीएस वर २५ लाख रु. चा रकमेसाठी प्रत्येकी २ लाख रु. चार्ज केला जायचा.
> त्याच वेळी, एनईएफटीला पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठविण्यासाठी ५० रुपये द्यावे लागत असत.
बँकेच्या शाखेद्वारे एनईएफटी किंवा आरटीजीएस व्यवहारांसाठी शुल्क लागू असणार आहे.
एनईएफटी / आरटीजीएस ऑनलाइन शुल्कांमध्ये केलेले बदल सर्व किरकोळ बचत, पगारदार, परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला ग्राहकांसाठी १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू केले असल्याचे बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.
ग्राहकांना वर्षातील २५ पानांचे एकच चेकबुक विनामूल्य मिळेल. २५ पानांचे अतिरिक्त चेकबुकसाठी ७५ रुपये द्यावे लागणार आहेत.