रायपूर : लॅण्डिंग करताना हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधून अपघाताची भीषणता समोर आली आहे.
रायपूर इथल्या स्वामी विवेकानंद एअरपोर्टवर हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर लॅण्ड करताना हा अपघात झाला. या अपघातानंतर हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं.
Tragic #helicopterCrash accident occurred at Swami Vivekanand airport Raipur, two pilots captain AP Shrivastva and captain Panda died in the crash. Chhattisgarh govt helicopter, #AugustaWestland -109. Earlier there were several complaints about the condition of the copter (SM) pic.twitter.com/oyWy6mcPGr
— avdhesh (@aviavi1001) May 12, 2022
अभी रायपुर में एयरपोर्ट पर स्टेट हेलीकॉप्टर के क्रैश होने की दुखद सूचना मिली.
इस दुखद हादसे में हमारे दोनों पायलट कैप्टन पंडा और कैप्टन श्रीवास्तव का दुखद निधन हो गया है।
इस दुःख की घड़ी में ईश्वर उनके परिवारजनों को संबल एवं दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे।
ॐ शांति:
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 12, 2022
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दुर्घटनेवर ट्वीट करून शोक व्यक्त केला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही दुर्घटना गुरुवारी रात्री 9.10 मिनिटांनी झाल्याची माहिती मिळाली. यावर भूपेश बघेल यांनी ट्वीट करून पायलटना श्रद्धांजली अर्पण केली. हा अपघात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.