हाय रिटर्न स्टॉक! बक्कळ परतावा मिळवण्यासाठी या स्टॉकमध्ये करा गुंतवणूक; तज्ज्ञांचा सल्ला

आम्ही तुम्हाला शेअर मार्केट एक्सपर्टने सुचवलेले Buy Call देत आहोत.

Updated: Aug 2, 2021, 02:28 PM IST
हाय रिटर्न स्टॉक! बक्कळ परतावा मिळवण्यासाठी या स्टॉकमध्ये करा गुंतवणूक; तज्ज्ञांचा सल्ला

नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी संबधीत शेअरचा अभ्यास असावा लागतो. त्या शेअरचे फंडामेंटल्स आणि चालीचा अंदाज घेऊन गुंतवणूक केल्यास हमखास चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट एक्सपर्टने सुचवलेले Buy Call देत आहोत.

झी मीडियाशी बोलताना मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी Mastek या शेअरच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. झी बिझिनेसचे  संपादक अनिल सिंघवी यांनी सुद्धा या शेअरला पसंती दिली आहे.

जाणून घेऊया शेअरच्या बाबतीत
ही एक टेक्नॉलॉजी सोल्युशन कंपनी आहे. कंपनी बरीच जुनी आहे. कंपनीचे नाव मोठे आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये कॅप तेवढी जास्त नाही. कंपनीचा महसूल चांगला आहे. कंपनीचे प्री मल्टीप्लस खूप जास्त आहेत. ज्या वेगाने कंपनीची वृद्धी सुरू आहे. त्यामानाने कंपनीचा शेअर सध्या खूपच स्वस्त आहे.

जून 2020 मध्ये Mastek कंपनीला 40 कोटींचा नफा झाला होता. या वर्षी हा नफा 70 कोटींवर गेला आहे. सध्या डिजिटल ट्रान्सफार्मेशनची धूम सुरू आहे. आयटी आणि मिडकॅप कंपन्या चांगले प्रदर्शन करीत आहेत. 

संदीप जैन यांनी या कंपनीत खरेदीचा सल्ला दिला आहे.

CMP - 2651.95
Target 1 - 2800
Target 2 - 3000