सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमकं काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय?

Hindenberg Research Report: विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतींचा अवलंब करुन विदेशी फंडमध्ये पसै लावले होते, असा दावा रिपोर्टमध्ये केला गेलाय. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 11, 2024, 02:43 PM IST
सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमकं काय कनेक्शन? हिंडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याच कारण काय? title=
सेबी प्रमुखांचं अदांनीशी नेमक काय कनेक्शन?

Hindenberg Research Report: साधारण दिड वर्षापुर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करुन खळबळ उडवून दिली. हिंडनबर्ग रिसर्चने शनिवारी 10 ऑगस्ट रोची मार्केट रेग्युलेटर सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. अदानी ग्रुपच्या ऑफशोर म्हणजेच विदेशी फंडमध्ये सेबी चेअरपर्सन माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची भागीदोरी होती, असा आरोप हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. हिंडनबर्गने हा रिपोर्ट आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला आहे. त्यानुसार सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे ती धवल बुच यांच्याकडे बरमुडा आणि मॉरिशस फंड्समध्ये स्टेक होता. याची लिंक विनोद अदांनींशी संबंधित आहे. विनोद अदानी हे दुबईत राहतात आणि ते गौतम अदानींचे मोठे भाऊ आहेत. विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतींचा अवलंब करुन विदेशी फंडमध्ये पसै लावले होते, असा दावा रिपोर्टमध्ये केला गेलाय. 

सेबी प्रमुखांनी कशी घेतली भागीदारी?

360 वेल्थ ऑनलाइनने बरमुडामध्ये एक विदेशी फंड बनवला.ग्लोबल अपॉर्च्युनिटी फंड असे या फंडचे नाव होते. बरमुडा एक टॅक्स हेवन देश आहे. येथे कर्जात मोठी सवलत असते. (जेथे कर आकारला जात नाही, किंवा करात सवलत मिळते.)  360 वेल्थ ऑनलाइन हे आयआयएफएलचे नवे नाव आहे. ग्लोबल अपॉर्च्युनिटी फंडच्या अंतर्गत एक सब फंड बनवला गेला. ज्याला ग्लोबल डायनामित अपॉर्च्युनिटी फंड म्हणून रजिस्टर करण्यात आलं. विनोद अदानींच्या एका कंपनीने या फंडमध्ये गुंतवणूक केली. यानंतर ग्लोबल डायनामिक अपॉर्च्युनिटी फंडने अदानी ग्रुपचा पैसा एका सब फंड (IPE Plus Fund) मध्ये गुंतवला. हा छोटा सब फंड मॉरिशसमध्ये रजिस्टर होता. मॉरिशसदेखील बरमुडाप्रमाणे एक टॅक्स हेवन देश आहे. या फंडने आपला पैसा डोमेस्टिक शेअर मार्केटमध्ये लावला आणि भारतीय शेअर बाजारातील शेअर्समध्ये खरेदी घोटाळा केला, असा दावा हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. 

सेबी प्रमुखांचे नाव कसे आले समोर?

हिंडनबर्ग रिपोर्टनुसार, सेबीच्या सध्याच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्याचे पती धवल बुच यांनी बरमुडा आणि मॉरिशसच्या या फंड हाऊसमध्ये गुपचूप स्टेक घेतले होते. विनोद अदानीयांनी ज्या किचकट स्ट्रक्चरचा वापर केला त्यात सेबी प्रमुखदेखील होत्या, असं रिपोर्टमध्ये म्हटलंय. सेबी प्रमुख आणि त्यांच्या पतीने 5 जून 2015 ला सिंगापूरच्या आयपीई प्लस फंडमध्ये आपलं अकाऊंट उघडलं होतं.फंडच्या डिक्लरेशननुसार, दोघांनी आपल्या पगारातून यात गुंतवणूक केली होती. त्यांची नेटवर्थ साधारण 1 कोटी डॉलर होती. फंडच्या डिक्लरेशन पेपरवर आयआयएफलची सहीदेखील होती. 

नाव हटवण्यासाठी सेबी प्रमुखांचा मेल?

हिंडनबर्गकडे असलेल्या कागदपत्रांनुसार, माधबी पुरी बुच या सेबीच्या होल टाइम मेंबर बनण्याच्या आधी त्यांचे पती घवल बुच यांनी मॉरिशस फंड अॅडमिनिस्ट्रेटला ट्रायडंट ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी एक पत्र लिहिलं होतं. हा मेल ग्लोबल डायनामिक अपॉर्च्युनिटी फंड संदर्भात होता. फंड हाऊसमधून माधवी बुचचे नाव हटलून मला एकमात्र अकाऊंट होल्डर बनवले जावे असा एक ईमेल केला होता. त्यामुळे सेबी चीफ अशा संवेदनशील पदावर नियुक्ती होण्यापुर्वी त्यांच्या पत्नीचे नाव अकाऊंटवर हटावं, असे त्यांना वाटत होते. त्यावेळी बुच यांची भागीदारी 872,762.25 डॉलर इतकी होती. भारतीय रुपयानुसार ही रक्कम 73269327.64 रुपये इतकी होते. 25 फेब्रुवारी 2018 ला माधवी यांनी आपल्या खासगी अकाऊंटमधून फंड रिडीम करण्यासाठी आयआयएफलला मेल लिहिला. त्यावेळी त्या सेबीच्या प्रमुख बनल्या होत्या, असा दावा हिंडनबर्गने केलाय.

निष्कर्ष काय?

मुख्य प्रवाहातील देशांतर्गत प्रतिष्ठित भारतीय म्युच्युअल फंड प्रोडक्ट्स असतानाही सेबी प्रमुख आणि त्यांच्या पतीने बाहेरच्या मल्टीलेयर फंडमध्ये आपला पैसा लावला. भारतीय शेअर मार्केटच्या योग्य पद्धतीने व्यवस्थापनाची जबाबदारी असताना त्यांनी हे केलं. सेबी प्रमुख आणि त्यांच्या पतीने आपला पैसा अशा फंडमध्ये लावला ज्याचा वापर विनोद अदानी यांनी आपले पैसे ठिकाणावर लावण्यासाठी सांगितले, असे हिंडनबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. अदानी ग्रुपच्या संशयास्पद ऑफशोर शेअरहोल्डरच्या विरोधात कठोर कारवाई करताना सेबीने टाळाटाळ केली. बुच दाम्पत्याला देखील त्या फंडचा उपयोग करायचा होता, ज्याचा उपयोग गौतम अदानींचे भाऊ विनोद अदानी करत होते. दोघांमध्ये संगनमतानेच हे होऊ शकते, असे हिंडनबर्गने म्हटले आहे.