दिल्लीत कोरोनाची वाढती चिंता, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

Updated: Jun 14, 2020, 07:11 AM IST
दिल्लीत कोरोनाची वाढती चिंता, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक title=

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. दररोज, राजधानीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बैठक बोलावली आहे.

दिल्लीत कोरोना विषाणूचे वाढते प्रकरण लक्षात घेता गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सकाळी 11 वाजता उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित असतील.

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी, दिल्लीतील कोरोना स्थितीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली.

याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी संध्याकाळी पाच वाजता आणखी एक बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांची ही दुसरी बैठक असेल. या बैठकीत दिल्ली महानगरपालिकेचे सर्व महापौर उपस्थित असतील. या व्यतिरिक्त दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे उपराज्यपाल या बैठकीस उपस्थित राहतील. आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हेही या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.