Chapati Cooking Hacks: थंड झाल्यावरही पोळी राहील मऊ आणि ताजी...लुसलुशीत पोळीसाठी 'या' टिप्स वापराचं.

Cooking Tips:  चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते . (how toget soft roti making ideas ) 

Updated: Jan 28, 2023, 05:00 PM IST
Chapati Cooking Hacks: थंड झाल्यावरही पोळी राहील मऊ आणि ताजी...लुसलुशीत पोळीसाठी 'या' टिप्स वापराचं.  title=

Kitchen Cooking Tips​ : चपाती हा आपल्या रोजच्या जेवणातला अविर्भाज्य पदार्थ. बरेच जण आहेत ज्यांना उत्तम चपात्या बनवता येतात पण असेही काही जण आहेत ज्यांना चपाती बनवणं (chapati making ) म्हणजे एक मोठं चॅलेंज वाटतं. काही जणांच्या बाबतीत होत असं की, चपाती गोल लाटली जाते पण तीच चपाती काही वेळाने खायचं म्हटलं म्हणजे ती कडक होते. मग अशावेळी कारणं म्हणून अनेक सबबी सांगितल्या जातात जस की, चपाती नीट भाजली नाही म्हणून कडक झालीये किंवा गहू बरोबर नसतील म्हणून चपाती कडक झाली. पण तुम्हाला माहित आहे का ? काही बेसिक गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही उत्तम चपाती बनवू शकता आणि ती चपाती जरी सकाळी बनवली असली तरी रात्रीपर्यंत ती तशीच मऊ आणि लुसलुशीत राहू शकते (how to get soft and fresh wheat roti)

चला जाणून घेऊया कशा ठेवाल पोळ्या मऊ आणि लुसलुशीत 

  • काही महत्वाच्या आणि बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण उत्तम पोळ्या बनवू शकतो आणि त्या फारवेळ ठेवल्या तरी मऊ आणि लुसलुशीतच राहतील . पोळ्या बनवताना पाणी आणि पिठाचं योग्य प्रमाण वापरलं पाहिजे. जर तुम्ही एक वाटी पीठ घेत असाल तर अर्धा वाटी पाण्यात ते पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घ्यावे. त्याचसोबत पिठात (cooking tips ) एक चिमूट मीठ घालायला विसरू नका. यामुळे चपातीला चव येते आणि ती मऊ राहते. (Kitchen Hacks how to get soft chapati chapati round chapati tips hacks)
  • पीठ मळण्याआधी ते चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे पीठ सैलसर होऊन चपात्या मऊ होऊ लागतात. 
  •  चपाती बनवण्यासाठी पीठ नेहमी मऊसर आणि सैलसर मळावे .असं केल्याने चपाती मऊसर राहते. याउलट पुऱ्या बनवायच्या असतील तर मात्र पीठ थोडं कडक मळावं लागत. 
  •  पीठ मळताना सर्वात आधी कोरडं पिठ घेऊन त्यात  हाताने एक खड्डा करावा त्यात हळूहळू पाणी घालत मग पीठ घालत मळून घ्यावं. लक्षात ठेवा पाणी हळूहळू घाला एकदम पाणी घालू नका. नाहीत पीठ पातळ होईल चपट्या लाटण मुश्किल होऊन बसेल.  
  •  चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते. 
  •  तव्यावर चपाती टाकल्यावर हे लक्षात ठेवा ती गोळा होता काम नये नाहीतर चपाती कधीच फुगणार नाही. 
  •  चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शिकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा. 

चला तर मग या टिप्स वापरा आणि तुमच्या चपात्या बघा कशा मऊ आणि लुसलुशीत राहतात.  (Kitchen Hacks how to get soft chapati chapati round chapati tips hacks)