Kitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य...

चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)

Updated: Jan 9, 2023, 05:25 PM IST
Kitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य... title=

Kitchen Cooking Tips: गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज सारखंच असतं. अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी अनेक गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू शकते आणि तासंनतास मऊच राहते.  (Cooking Tips for Kned Dough easy and quick for soft chapati)

बऱ्याचदा चपाती भाजली (chapati making) नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..

चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)

चपातीसाठी पीठ मळताना हात बरबटले जातात ते साफ करता करता नाकी नऊ येतात, त्यात पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर वैताग येतो. अश्यावेळी चला पाहूया कणिक पाळण्याची सोपी पद्धत (Cooking Tips for Kned Dough easy and quick for soft chapati)

पीठ मळण्यासाठी दिड काप कणिक घ्या , अर्धा चमचा तेल, पाणी आणि चंपीप्रमाणे मीठ इतकं आवश्यक आहे. पीठ मळताना नेहमी एक लक्षात ठेवा कधीही खोलगट भांड्याचा वापर करा.. आता या भांड्यात गव्हाचं पीठ घाला त्यात दोन चमचे तेल घाला.  (तेल घातल्याने पीठ मऊसर होते शिवाय याच्या चपात्या चांगल्या मऊसूद राहतात) आता लागेलतंस पाणी घालून घ्या...आता तुम्हाला कल्पनाही नसेल अशी एक गोष्ट तुम्हाला मदत करणार आहे... ते म्हणजे चपाती लाटण्याचं लाटणं...(Cooking Tips for Kned Dough easy and quick for soft chapati)

(Video Credit : My cooking and more)

हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे, हे सर्व मिश्रण तुम्हाला लाटण्याच्या एका टोकाने गोल गोल फिरवायच आहे,  एक लक्षात ठेवा एका दिशेने तुम्हाला हे फिरवायचं  आहे, लागेल तास पाणी हळू हळू घाला आणि अवघ्या काही मिनिटात पिठाचा मऊसूद आणि लाटायला सोपा गोळा तयार..