रात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं

Hyderabad Crime : तेलंगणातील हैदराबादमधील अंबरपेट 23 वर्षीय निकीताने वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा वडिलांशी वाद झाल्यानंतर ही घटना घडली. निकीताच्या वडिलांना तिला रात्री उशिरा घरी येण्याचा सल्ला दिला होता.

आकाश नेटके | Updated: Aug 2, 2023, 03:19 PM IST
रात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं title=
(फोटो सौजन्य - PTI)

Crime News : हैदराबादमध्ये (Hyderabad Crime) एका मुलीने तिच्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादच्या अंबरपेट भागात एका मुलीवर तिच्या वडिलांची हत्या केली आहे. 23 वर्षीय मुलीने निर्दयीपणे वडिलांचा गळा चिरून खून केला आहे. वडिलांसोबत वाद झाल्यानंतर मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. रात्री उशिरा आल्याने मुलीचे वडील तिला ओरडले होते. यानंतर झालेल्या वादातून मुलीने वडिलांनाच संपवलं आहे. पोलिसांनी (Hyderabad Police) मुलीला अटक केली आहे.

शनिवारी आरोपी निकिताचा तिच्या वडिलांसोबत वाद झाला असता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा घरी आल्याने वडिलांनी तिला शिवीगाळ केली. वेळेवर घरी ये असे तिच्या वडिलांनी सांगितले होते. आपली मुलगी रात्री उशिरा घरी येणे तिच्या वडिलांना पसंत नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि निकिताने वडिलांची हत्या केली. निकीताच्या या धक्कादायक कृत्याने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरपेठमधील  तुळशीराम नगर येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. निकिता ही तिचे वडील जगदीश आणि आई सत्यम्मा यांच्यासोबत राहत होती. जगदीशला दारूचे व्यसन होते. त्यामुळे जगदीशचे आणि निकीताचे वारंवार भांडण होत होते. आजूबाजूच्या लोकांनाही याबद्दल माहिती होती. दोघांमधील भांडणे ही शेजाऱ्यांसाठी एक सामान्य गोष्ट होती. दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. मात्र, कधी निकिता आपल्या वडिलांची हत्या करू शकते, याची कोणालाच कल्पना नव्हती.

शनिवारी निकीता घरी उशिरा आली होती. त्यावेळी जगदीशने निकीताला शिवीगाळ केली. त्यावेळीसुद्धा जगदीश दारूच्या नशेत होता. जगदीशने शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर निकिताने धारदार शस्त्र उचलून वडिलांच्या मानेवर वार केले. जगदीशला तात्काळ उस्मानिया रुग्णालयात दाखल केले. मात्र  उपचारादरम्यान जगदीश यांचा मृत्यू झाला.

माध्यमांच्या वृत्तानुसार, निकिता हैदराबादमधील एका दुकानामध्ये विक्रेती म्हणून काम करत होती. पोलिसांनी निकिताला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निकीतावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दुसरीकडे आता निकीताची आई घरी एकटीच आहे. दरम्यान, निकीताच्या या कृतीने परिसरामध्ये दहशत पसरली आहे.