ब्रेकअप करणाऱ्या गर्लफ्रेंडला दिलं IAS होऊन दाखवण्याचं चॅलेंज, वाचा आदित्यच्या यशाची कहाणी

IAS Aaditya Pandey Success Story: ही कहाणी यावर्षी यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या आदित्य पांडे यांची आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 1, 2023, 04:46 PM IST
ब्रेकअप करणाऱ्या गर्लफ्रेंडला दिलं IAS होऊन दाखवण्याचं चॅलेंज, वाचा आदित्यच्या यशाची कहाणी title=

IAS Aaditya Pandey Success Story: ब्रेकअप झाल्यावर तरुण तरुणी निराश होतात. यातील अनेकांना जगण्याचं कारण सापडत नाही. पण असेही काहीजण असतात. जे यातून उभारी घेतात. आणि स्वत:ला अशक्य वाटणारं आव्हान देतात आणि ते पूर्ण करण्यासाठी प्राण पणाला लावतात. आज आपण अशीच एक कहाणी जाणून घेणार आहोत. ही कहाणी यावर्षी यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या आदित्य पांडे यांची आहे. 

आदित्य पांडे हे बिहारमधील पटणाचे रहिवाशी असून शालेय जीवनात आदित्य खूप मस्ती करायचा. त्याची मस्ती पाहून शिक्षक देखील हैराण होते. 'आदित्य जर यशस्वी झाला तर मी मिशा काढेन, असेदेखील एका शिक्षकाने आदित्यला सांगितले होते.

आदित्य हा तीन बहिणी आणि एका भावात सर्वात लहान आहे. लहान असल्याने लहानपणापासूनच त्यांना खूप प्रेम मिळाले. आदित्यची एक बहिण लग्नानंतर गुजरातमधील जामनगर येथे राहू लागली होती. पाटणा येथे सुरुवातीच्या शिक्षणानंतर आदित्य तेथे गेले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जामनगर, गुजराम येथे बहिणीकडे राहून केले. 

नंतर  आदित्य पाटण्याला परत आले आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आदित्य यांना इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी होती. यानंतर त्यांनी एमबीए केले. घरची परिस्थिती देखील इतकी चांगली नव्हती. दरम्यान आदित्य एका मुलीच्या प्रेमात पडला. पण इथून पुढे आदित्यच्या जीवनात काहीतरी वेगळं घडणार होतं. 'तू वाईट आहेस असे म्हणत ती आदित्यला सोडून निघून गेली. हा आदित्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

आदित्यने शांतपण तिच्याशी संवाद साधला. तू ब्रेकअपचे दुखणे देऊन चांगले केले नाहीस, पण बघ, एक दिवस मी नक्कीच UPSC क्रॅक करून IAS होईन, असे आदित्यने तिला सांगितले.

आदित्य यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पण सुरुवातीच्या परीक्षेत त्यांना दोनवेळा अपयश आले होते. त्यानंतर त्यांनी अधिक मेहनत घेतली आणि यावर्षी झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. देशातील सर्वात कठीण परीक्षेत त्यांनी 48 वा क्रमांक पटकावला.