Leaders : पूर्व परीक्षेत 2 वेळा नापास, पण जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर

त्या थांबल्या नाहीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर

Updated: Nov 7, 2021, 03:27 PM IST
Leaders : पूर्व परीक्षेत 2 वेळा नापास, पण जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर title=

Leaders : IAS परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र काही विद्यार्थ्यांना यश मिळते. गुंजन द्विवेदी (आयएएस गुंजन द्विवेदी) देखील अशाचं भाग्यवान लोकांपैकी एक आहेत, ज्यांनी सलग दोनदा अपयशी होऊनही शेवटी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. गुंजन द्विवेदी मूळच्या लखनऊच्या रहिवासी आहेत, त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच अभ्यासाचं वातावरण होतं. त्यांचे वडील अशोक कुमार धर द्विवेदी हे निवृत्त आयपीएस होते. त्यांची मोठी बहीण उमंग द्विवेदी व्यावसायिक कर अधिकारी आहेत. त्यामुळे अधिकारी होण्याची इच्छा लहानपणापासूनच त्यांच्या मनात घर करून गेली होती.

दिल्लीच्या दौलत राम कॉलेजमधून बी.ए
गुंजन द्विवेदी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयातून 2014 मध्ये राज्यशास्त्रात बीए केले. पदवीनंतर लगेचच त्यांनी आयएएसची तयारी सुरू केली. गुंजन यांनी मोठा भाऊ ऍडव्होकेट समन्वय धर द्विवेदी यांच्या चेंबरचं रूपांतर अभ्यासाच्या खोलीत केलं. त्यानंतर त्यांनी तिथे आयएएस मॉक टेस्ट सोडवायला सुरुवात केली.

पूर्व परीक्षेत सलग दोनदा अपयश
गुंजन द्विवेदी यांनी 2016 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना पूर्वपरीक्षाही पास करता आली नाही. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्याचं जिद्दीने पुन्हा परीक्षेची तयारी केली. पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यावेळीही त्या नापास झाल्या. सलग दोन वर्षे यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत नापास झाल्यामुळे त्याचा उत्साह कमी झाला, पण त्यांनी तयारीत खंड पडू दिला नाही.

परीक्षेची तयारी नव्याने सुरू 
गुंजन द्विवेदी यांनी तयारीचे नव्याने विश्लेषण केले आणि उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्यांनी 2018 साली सलग तिसऱ्या वर्षी UPSC परीक्षा दिली. त्यांनी केवळ पूर्वपरीक्षा उत्तम प्रकारे पास केली नाही तर मुख्य परीक्षा आणि मुलाखतही उत्तीर्ण करून गुणवत्तेत स्थान मिळवले. 2019 मध्ये जाहीर झालेल्या निकालात त्या अखिल भारतात 9व्या क्रमांकावर आल्या.

'एकाग्रतेने 5-6 तासांचा अभ्यास पुरेसा'
परीक्षेच्या रणनीतीबाबत गुंजन सांगतात की, नागरी सेवांमध्ये यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मॉक टेस्ट देणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे सतत काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते आणि सराव देखील होतो. अभ्यासाच्या तासांबद्दल, गुंजन (IAS गुंजन द्विवेदी) म्हणतात की तुम्ही 18-20 तास अभ्यास केलाच पाहिजे असे नाही, पूर्ण एकाग्रतेने नियमितपणे 

अभ्यास केल्यास 5-6 तासांचा अभ्यासही पुरेसा आहे...

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना गुंजन सांगतात, सहावी ते इयत्ता 12वीपर्यंतच्या NCERT पुस्तकांवर आपली पकड मजबूत करावी. यासोबतच उत्तरे लिहिण्याचा नियमित सराव करा आणि वेळेचे व्यवस्थापन भक्कम ठेवा. जर आत्मविश्वास उच्च असेल तर यश स्वतःचं असेलय... त्यामुळे कोणतही काम करण्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे.