IDBI Bank MCLR Rates: IDBI या राष्ट्रीय बँकेनं रातोरात मोठा निर्णय घेतला आहे. याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. यामुळे कर्जाचा EMI वाढणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट(reserve bank repo rate) जाहीर केल्यानंतर कर्जदारांना झटका बसला आहे. यानंतर आता बजेट(Union Budget 2023) नंतर देखील महत्वपूर्ण बदल होऊ शकतात. यामुळे विविध प्रकारची कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना अणखी दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
IDBI बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR चा रेट 20 बेस पॉईंटने वाढवला आहे. बँकेच्या (IDBI बँक) अधिकृत वेबसाइटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR). 12 जानेवारी 2023 पासून नव्या MCLR नुसार कर्ज दरांचे नवीन दर पासून लागू होणार आहेत. MCLR मधील वाढ थेट ग्राहकांच्या कर्जावर परिणाम करणार आहे. यामुळे कर्जा EMI अर्थात हप्ता वाढणार आहे.
IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार हा नवीन MCLR दर जाहीर करण्यात आला आहे. MCLR 7.65 टक्के केला आहे. एका महिन्याच्या एमसीएलआरसाठी 7.80 टक्के, तीन महिन्यांसाठी 8.10 टक्के आणि 6 महिन्यांच्या एमसीएलआरसाठी 8.30 टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. IDBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एका वर्षाच्या MCLR वर 8.40 टक्के, 2-वर्षाच्या MCLR वर 9 टक्के आणि तीन वर्षांच्या MCLR वर 9.40 टक्के असा दर निश्चित केला आहे.
बँक ऑफ बड़ौदा (Bank of Baroda) ने देखील आपले MCLR रेट वाढवले आहेत. बँकेच्या ऑफिशियल फाइलिंग नुसार BOB ने देखील रातोरात MCLR चा रेट 7.50 टक्क्यांवरुन 7.85 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. यामुळे बेसिकमध्ये 35 अंकांची वाढ झाली आहे. तीन आणि सहा महीने तसेच एका वर्षाच्या कालावधीसाठी कर्जामध्ये MCLR ने 20 टक्क्यांची वाढ केलेय.