'इंग्रज नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशिक्षित राहिले असते'

तर बाबासाहेबांना कोणत्याच शाळेत प्रवेश मिळाला नसता.

Updated: Oct 26, 2018, 12:35 PM IST
 'इंग्रज नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशिक्षित राहिले असते' title=

जयपूर: भारतात इंग्रजांचे राज्य नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशिक्षित राहिले असते, असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाचे नेते धर्मवीर सिंह अशोक यांनी केले. ते गुरुवारी जयपूर येथील प्रचारसभेत बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, इंग्रजांनी भारतावर आणखी १०० वर्षे राज्य करायला पाहिजे होते. त्यांच्या राज्यात अनुसुचित जाती आणि ओबीसी वर्गातील लोकांचे शोषण झाले नसते. कारण, ब्रिटिशांच्या काळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाची संधी मिळाली. जर इंग्रज या देशात आलेच नसते तर बाबासाहेबांना कोणत्याच शाळेत प्रवेश मिळाला नसता, असे धर्मवीर सिंह अशोक यांनी म्हटले. 

धर्मवीर सिंह अशोक हे बसपाचे राजस्थानमधील प्रभारी आहेत. साहजिकच त्यांच्या या विधानानंतर विरोधक बसपावर तुटून पडले आहेत. राजस्थानमध्ये येत्या ७ डिसेंबरला मतदान होत असून ११ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.