मुंबई : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणूक म्हटलं की, मतदान आलंच आणि मतदानासाठी महत्वाचं असतं ते मतदार ओळखपत्र. हे ओळखपत्र भारत सरकारद्वारे सर्व नागरीकांना दिले जातात. हा तुमच्या ओळखीचा पुरावा मानला जातो, तसेच यामुळे तुमची ओळख देखील पटते. मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी केलेले एक आवश्यक दस्तऐवज आहे जे प्रादेशिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांमध्ये नागरिकांना मतदान करण्याची परवानगी देते.
तुमचे मतदार ओळखपत्र हरवले असेल आणि तुम्ही एफआयआर नोंदवला नसेल किंवा नवीन कार्डसाठी अर्ज केला नसेल, तर तुम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक मर्यादित कंपन्याद्वारे जारी केलेले पासबुकद्वारे जारी केलेले पर्यायी दस्तऐवज सबमिट करून तुमचे मतदार ओळखपत्र सादर करू शकता.
तसेच फोटो ओळखपत्र (EPIC)व्यतिरिक्त मतदार ओळखपत्राला पर्याय म्हणून ही 11 डॉक्युमेंट ओळखपत्र म्हणून वापरु शकता. यासोबत आम्ही तुम्हाला डिजिटल व्होटर आयडी कार्ड कसे डाउनलोड करता येईल हे देखील सांगणार आहोत.
- पॅन कार्ड
-चालक परवाना
- पासपोर्ट
-केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटो असलेले सेवा ओळखपत्र
- बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो असलेले पासबुक
-राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
-कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
-फोटोसह पेन्शन दस्तऐवज
- खासदार/आमदार/एमएलसी यांच्याकडून जारी केलेल अधिकृत ओळखपत्र
-आधार कार्ड
यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचं नाव मतदान यादीत असलं पाहिजे, असा नियम निवडणूक आयोगानं केला आहे. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास आणि तुमच्याकडे ECI ने विहित केलेले ओळख दस्तऐवज असल्यास, तुम्हाला मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
डिजिटल व्होटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/ ला भेट द्यावी लागेल.
NVSP पोर्टलवर तुमच्या खात्यात नोंदणी करा किंवा लॉग इन करा.
लक्षात घ्या की लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे खाते असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे खाते नसेल, तर तुम्ही ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाने खाते तयार करू शकता.
खाते तयार केल्यानंतर, तुम्हाला काही तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
सर्व तपशील टाकल्यानंतर एक लॉगिन आयडी तयार होईल. आता पोर्टलवर लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा आणि राज्य निवडा.
तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP मिळेल. OTP एंटर करा आणि तुम्हाला e-EPIC डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
डाउनलोड E-Epic वर क्लिक करा
मतदार ओळखपत्राची PDF फाईल डाउनलोड केली जाईल.
तुम्ही e-EPIC जतन करू शकता किंवा ओळखपत्र प्रिंट करू शकता.