मुंबई : गावागावांत आरोग्य स्वास्थाची काय अवस्था आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुरूवारी समोर आलेला प्रकार धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील ताजनगरी आगरा येथे एसएम मेडिकल कॉलेज प्रशासनाने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे.
आपल्या आजारी आईला उपचाराकरता घेऊन आलेल्या मुलावर अतिशय वाईट परिस्थिती आली आहे. स्वतःच्या खांद्यावर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन मुलगा तासन् तास सिलेंडरची वाट पाहत होता. त्या मुलाच्या खांद्यावर ऑक्सिजन तर आईने मास्क लावला होता. अशा परिस्थितीत अनेक तास उभे राहूनही रूग्णवाहिका मात्र काही आली नाही
रुनकताची राहणारी अंगूरी देवी यांना दम्याचा त्रास जाणत होता. त्याकरता त्यांना ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. ऑक्सिजन लावल्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट होण्यासाठी बाहेर जाण्यास सांगितलं. वॉर्ड भरपूर लांब असला कारणाने त्यांना रूग्णवाहिकेची गरज होती. त्याकरता ते रोडवर उभे होते. पण बराच वेळ वाट पाहूनही रूग्णवाहिका आली नाही.
अनेक वेळ वाट पाहूनही अॅम्बुलन्स आली नाही. म्हणून त्या मुलाला आपल्या आईला घेऊन उन्हात उभं रहावं लागलं. त्यावेळी बराच काळ उन्हात उभं राहिल्याने आईची तब्बेत बिघडली.