जर्मनीतील कार्यक्रमात राहुल गांधीची भाजपा सरकारवर टीका

जर्मनीतल्या हँबुर्ग शहरातील एका कार्यक्रमात बोलत होते.

Updated: Aug 23, 2018, 12:11 PM IST

नवी दिल्ली : देशात झुंडशाहीतून होणाऱ्या हत्यांना बेरोजगारी, नोटाबंदी आणि जीएसटी याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. ते काल रात्री जर्मनीतल्या हँबुर्ग शहरातील एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारनं गरीब शेतकरी, अल्पसंख्याक आणि श्रीमंत यांच्यात भेदभाव केल्याचा दावा केला. 

दलित, अल्पसंख्यांकापर्यंत फायदा पोहोचत नसल्याचेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल यांच्या भाषणानंतर भाजपातर्फे अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाहीए.