Extramarital Affair: ...म्हणून सासरच्या लोकांनी जावयाचे अपहरण करुन त्याला मुत्र पाजले; कारण समजून धक्का बसेल

जावयाला सासरच्या मंडळींनी भयानक शिक्षा दिली आहे. त्याच्यासह अमानवीय कृत्य करण्यात आले आहे. हरयाणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे (Haryana Crime News).

Updated: Jan 24, 2023, 09:00 PM IST
Extramarital Affair:  ...म्हणून सासरच्या लोकांनी जावयाचे अपहरण करुन त्याला मुत्र पाजले; कारण समजून धक्का बसेल

Haryana Crime News : जावयाने केलेल्या चुकीबद्दल सासरच्या मंडळींनी त्याला भयानक शिक्षा दिली आहे.  सासरच्या लोकांनी जावयाचे अपहरण करुन त्याला नग्न केले आणि मुत्र पाजले. हरयाणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे (Haryana Crime News). या मागे धक्कादायक कारण समोर आले आहे. या अमानवीय घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडीत व्यक्तीचे विवाहबाह्य संबध (Extramarital Affair) होते. त्याला अद्दल घडवण्यासाठी शिक्षा म्हणून हे कृत्य केल्याचे समजते. 

हरयाणा मधील पानिपत येथील करनाल गावात ही भयंकर घटना घडली आहे. पीडीत व्यक्तीहा विवाहीत असून सात मुलांचा पिता आहे. त्याचे विवाहबाह्य संबधअसल्याची कुणकुण त्याच्या पात्नीच्या माहेरच्या मंडळींना लागली होती. या व्यक्तीचे त्याच्या मेव्हणीसोबतच विवाहबाह्य संबध होते.

सासरच्या लोकांनी या जावयाचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी या जावयाला तब्बल 15 तास एका ठिकाणी डांबून ठेवले. ऐवढ्यावरच हे थांबले नाहीत. त्यांनी जावयाला विवस्त्र करुन त्याला शिवीगाळ केली. क्रूरतेचा कहर म्हणजे त्यांनी याला जबरदस्तीने मूत्र पाजले. या सर्व प्रकाराचा त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. हा व्हिडिओ त्यांनी फॅमिलीच्या WhatsApp ग्रुपवर देखील शेअर केला.  अपहरण केलेल्यांच्या तावाडीतून सुटल्यावर या जावयाने थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेत पाच ते सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

जावयाच्या पार्श्वभागात ग्लास घातला

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेलेल्या जावयावर सासरच्या मंडळींनी अमानुष अत्याचार केला. पत्नीला परत पाठवण्याऐवजी सासरच्या लोकांनी जावयालाच बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. ऐवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर, त्यांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टिलचं ग्लास टाकले. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन हे ग्लास काढले.