देशात कोरोनावर मात करण्यासाठी ४ लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात - केंद्रीय आरोग्यमंत्री

सध्या संपूर्ण जग कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे.  

Updated: May 25, 2020, 09:19 AM IST
देशात कोरोनावर मात करण्यासाठी ४ लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात -  केंद्रीय आरोग्यमंत्री title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप जगभर पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात ज्याप्रमाणे मास्क, सोशल डिस्टन्सिंग सारख्या गोष्टींचा वापर युद्धपातळीवर होत आहे, त्याचप्रमाणे कोरोनावर लस शोधण्याच्या  कामालाही गती मिळत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, देशातील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी  १४ लसींची प्रभावी आहेत. त्यापैकी ४ लसींवर लवकरच वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. 

सोशल मीडियावर भाजप नेते जी व्ही एल नरसिम्हा राव यांच्यासोबत झालेल्या संवादात ते बोलत होते. देशात कोरोनावर मात करण्यासाठी लस कोणत्या टप्प्यात आहे, असा प्रश्न राव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना विचारला. तेव्हा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी  ४ लसींवर लवकरच वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

ते म्हणाले, 'सध्या संपूर्ण जग कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त लसी प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. ज्या विकासाच्या विभिन्न स्तरांवर काम करत आहेत. देशांच्या या प्रयत्नांमध्ये जागतिक आरोग्य संघटना देखील समन्वय साधत आहे. भारतही त्यात सक्रियपणे कार्यरत अल्याची माहिती हर्ष वर्धन यांनी दिली. 

शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्याही लसीची अपेक्षा करणं सध्या योग्य नाही. लस पूर्णपणे तयार होण्यासाठी जवळपास १ वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं असल्यांचं त्यांनी सांगितलं.