Income Tax : 1 ऑगस्टला ITR फाईल करणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार?

तुम्ही अजूनही ITR भरला नसेल, तर आजच हे काम उरका. नाहीतर उगाचचा फटका बसेल  

Updated: Jul 28, 2022, 12:35 PM IST
Income Tax : 1 ऑगस्टला ITR फाईल करणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार? title=

मुंबई : तुम्ही अजूनही ITR फाईल केला नसेल तर तुमच्याकडे दोन दिवस वेळ आहे. पण तुमचा आळशीपणा किंवा बेजबाबदारपणाचा तुमच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसू शकतो. 31 जुलैनंतर ITR भरण्यासाठी कोणतीही तारीख अजूनतरी सरकारने वाढवली नाही.

1 ऑगस्टपासून पुढे ITR भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. आधीच महागाईच्या तीव्र झळा बसत असताना तुम्ही ITR लवकर भरून टाका. नाहीतर सरकारकडून किती दंड भरावा लागणार याबाबत जाणून घेऊया. 

तुम्ही दिलेल्या मुदतीपूर्वी जर आयटीआर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. तर 5 लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ही रक्कम वाढून हा दंड 10 हजार रुपये देखील केला जाऊ शकतो. 

 तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तिथे ऑनलाईन आयटीआर भरू शकता. तुम्ही आधी तिथे रजिस्टर करा. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती अपलोड करून लॉग इन करा. योग्य फॉर्मची निवड करा.

 चुकीच्या फॉर्मची निवड केली तर तुमचा टॅक्स कापला जाऊ शकतो. त्यामुळे फॉर्म निवडताना चूक करू नका. ही संपूर्ण माहिती आणि बँक खात्याची माहिती द्या आणि त्यानंतर प्रोसेस करा. तुम्हाला घरच्या घरी देखील आयटीआर भरता येऊ शकतो.